आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्री सायली संजीव म्हणतेय, 'ही' पैठणी मला मनापासून...कष्टाने विणायची आहे 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः काहे दिया परदेस या मराठी मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव सध्या काय करतेय असा प्रश्न नक्कीच तिच्या चाहत्यांना पडला असणार आहे. याचे उत्तर आता स्वतः सायलीने दिले आहे. सायली लवकरच तिच्या नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असून तिने तिच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. इन्स्टाग्रामवर सायलीने गोष्ट एका पैठणीची या नवीन चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. सोबतच तिने लिहिले,  ''माझ्या अभिनयाच्या प्रवासातलं सगळ्यात सुंदर वळण म्हणजे “पैठणी” हा चित्रपट. यासाठी मी @akshaybardapurkar @shantanurode आणि team @planet.marathi @planetmarathitalent चे कसे आभार मानू तेच कळत नाही. मी ऋणी आहे तुमची.ही “पैठणी” मला मनापासून...कष्टाने विणायची आहे. त्यासाठी तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या हीच विनंती..!""

“गोष्ट एका पैठणीची” हा चित्रपट शंतनू रोडे दिग्दर्शित करणार असून येत्या 24 नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रपटात सायलीसोबत  'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता सुव्रत जोशी मुख्य भूमिका साकारतोय. सायली आणि सुव्रत यांच्यासोबत आणखी कोणते कलाकार चित्रपटात असतील, याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.  सोबतच चित्रपटाची कथा नेमकी काय आहे, याचाही उलगडा झालेला नाही.