Home | News | Actress shabana azmi hospitalised after diagnosed with swine flu

Swine Flu: शबाना आझमी यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 14, 2019, 01:07 PM IST

हे बळजबरी ब्रेक घेण्यासारखे आहे असे शबाना यांनी ट्वीट केले आहे.

  • Actress shabana azmi hospitalised after diagnosed with swine flu

    मुंबई - बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाइन फ्लू झाला. सर्दी झाल्यानंतर त्यांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये बुधवारी स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या दरम्यान रुग्णालयात दाखल होणे म्हणजे, बळजबरी ब्रेक घेण्यासारखे आहे असे शबाना यांनी ट्वीट केले आहे.


    शबाना आझमी यांनी ट्वीट करून पुढे लिहिले, की त्या रिकाम्या वेळेचा पुरेपूर उपयोग करत आहेत. "मला आत्मनिरीक्षण करण्याचा क्वचितच वेळ मिळतो. त्यामुळे, रुग्णालयात भरती होणे माझ्यासाठी ब्रेक घेण्यासारखे आहे. मी रुग्णालयात दाखल झाले असून माझ्या आरोग्यात सुधारणा होत आहेत. स्वाइन फ्लू अर्थातच इनफ्लुएंझाच्या तापीचे व्हायरस हवेतून पसरतात. खोकलणे, शिंकणे किंवा थुंकल्याने त्याचा इतरांना संसर्ग होऊ शकतो.

Trending