आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Shama Sikandar Refuses News Of Plastic Surgery, Says 'No Proof Is Available To Anyone'

अभिनेत्री शमा सिकंदरने केले प्लास्टिक सर्जरीच्या बातम्यांचे खंडन, म्हणाली - 'कुणाकडेच याचा पुरावा नाही' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : छोट्या आणि मोठ्या दोन्ही पडद्यानावर आपला अभिनय साकारणारी अभिनेत्री शमा सिकंदर लवकरच चित्रपटांत परतणार आहे. आगामी चित्रपट 'बायपास रोड' मध्ये ती अभिनेता नील नितिन मुकेशच्या अपोजिट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दैनिक भास्करसोबतच्या बातचितीमध्ये शमाने आपला चित्रपट आणि करियरशी निगकाडीत अनेक गोष्टी शेअर केल्या. यादरम्यान तिने आपल्या प्लास्टिक सर्जरीशी निगडित बातम्यांचेही खंडन केले. तिने सांगितल्याप्रमाणे, ज्याप्रमाणे लोक तिच्या लुक्सबद्दल निगेटिव्ह बोलतात, तिला ट्रोल करतात, त्यात काहीही सत्य नाहीये.  

 

'स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी एक्साइटेड आहे' - शमा... 
एवढे वर्ष इंडस्ट्रीमध्ये असूनही जर माझा कोमट नवा प्रोजेक्ट समोर येत असतो तेव्हा एक वेगळ्याच प्रकारची नर्वसनेस होते आहे. 'बायपास रोड' द्वारे पहिल्यांदा नील नितिन मुकेशसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे आणि खूप वर्षानंतर स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. नीलकडून खूप काही शिकायला मिळाले. माझ्या भूमिकेविषयी बोलायचे झाले तर मला त्याबाबतीत काहीही बोलण्याची परवानगी नाही. जेव्हा चित्रपटाचे शूटिंग संपेल आणि प्रमोशन सुरु होईल तेव्हा मी याबद्दल बोलेल.  

 

'डिजिटल मीडियाचा विकास पाहून खुश आहे.'
अभिनेत्री असल्याच्या नात्याने मी स्वतःला नशीबवान मानते की, मला प्रत्येक प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर काम करण्याची संधी मिळाली आहे. मग टीव्ही असो किंवा चित्रपट किंवा वेब सीरीज. प्रत्येक ठिकाणी मी माझी कला सादर केली आहे. ज्याप्रमाणे डिजिटल मध्यम वेगाने वाढत आहे, ते पाहून मी खूप खुश आहे. आधी कलाकारांजवळ जास्त पर्याय नसायचंहे. त्यांना मोठ्या निर्मात्यांवर अवलंबून राहावे लागायचे. पण आता असे नाहीये. आज लोक आपल्या फोनवर शार्ट फिल्म बनवत आहेत, जायचे कौतुकही होत आहे. या क्रांतीचा भाग बनून खूप खुश आहे.  

 

'अनेक लोक माझ्या बायोपिकची आयडिया घेऊन आले आहेत'
मेनी करा अथवा नाक आकारू, पण अनेक लोक माझ्याकडफे माझा बायोपिक बनवण्याची आयडिया घेऊन येऊन गेलेलले आहेत. मला स्वतःलाच आवडेल की, माझ्या आयुष्यातील खाचखळग्यांची चांगल्या वाईट अनुभवांची गोष्ट सर्वांसमोर यावी. पण हे केव्हा होईल ? ते माहित नाही. पण हो जर काही वर्षात असे काही प्लॅनिंग झाले तर तर मी स्वतःच माझी भूमिका साकारेन.   

 

'ट्रोलर्सचे काहीही केले जाऊ शकत नाही...'
अनेक लोक मला ट्रोल करतात, पण मला यामुळे काही फरक पडत नाही. मला वाटते की, मला वाटते की, या ट्रोलर्सना आयुष्य जगण्याची पद्धत शिकवली पाहिजे. यांचे विचार फारच घाणेरडे आणि विक्षिप्त आहेत. ज्याचे आपण काहीही करू शकत नाही. माझ्या आसपास अनेक असे लोक आहेत जे मला रोज कॉम्पलिमेंट देतात. ते माझी हिंमत आहेत, निगेटिव्ह कमेंट्सनेर मला कधी फरक पडत नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी मिळवल्या आहेत. ज्यासाठी मी खूप खुश आहे.  

 

'कुछ तो लोग कहेंगे'
जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा लोक म्हणायचे की, हिच्या चेहऱ्यावर तर अजिबातच निरागसता नाहीये. त्यानंतर जेव्हा मी माझा पहिला टीव्ही शो केला तेव्हा लोक म्हणाले, 'अरे ही तर खूप इनोसंट दिसते, स्ट्रॉन्ग रोल कदाचितच करू शकेल.' तेच लोक आता म्हणतात, 'ओह माय गॉड तुम्ही खूप हॉट आहात. लोकांची प्रतिक्रिया प्रत्येकवेळी बदलते. यामध्ये तुम्ही काय करू शकता ? कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना...' 

 

'प्लास्टिक सर्जरीचा कुणाकडेच पुरावा नाही...'
अनेक लोक माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर फोटोज पाहून कमेंट करतात की, मी प्लास्टिक सर्जरी केली आहे. खार सांगू तर अशा कमेंट्स वाचून मी हस्ते. कुणाकडेच याचा काहीच पुरावा नाही की, मी प्लास्टिक किंवा कोणत्याही प्रकारची सर्जरी आपल्या बॉडीवर केली आहे. मी वेगळी दिसू लागले तर लोकांनी तर्क लावायला सुरुवात केली, जे एकदम चुकीचे आहे. या लोकांना कळायला हवे की, तुम्ही मेकअपद्वारे वेगळे दिसू शकता. मार्केटमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्ही वेगळ्या दिसू शकता. सर्जरी करणेच गरजेचे नसते.  

 

'डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डरचा सामना केला आहे.'
मी डिप्रेशन आणि बायपोलर डिसऑर्डरचा सामना केला आहे. त्यातून बाहेर आल्यानंतर माझ्यामध्ये खूप बदल झाले आहेत. 16 वर्षांच्या वयामध्ये वेगळी दिसायचे आणि आता काहीशी वेगळी ज्यामध्ये काहीच चुकीचे नाही. मला मेकअप करता येतो. ड्रेसिंग स्टाइल माझी खूप वेगळी आहे. मी माझा मेकओव्हर केला आहे आणि लोक याला सर्जरीचे नाव देतात. आता मी या सर्व गीष्टींना इग्नोर करायला सुरुवात केली आहे.  

 

'संधी मिळताच मी आणि जेम्स लग्न करणार आहोत.'
मी आणि जेम्स (मिलिरॉन) आमचे आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगत आहोत. दोघे एकमेकांसोबत खुश आहोत आणि जेव्हाही संधी मिळेल तेव्हा आम्ही लग्न करणार आहोत. 

बातम्या आणखी आहेत...