आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा चित्रपटांत काम करु इच्छिते अक्षय कुमारची पहिली हिरोईन, सांगितले का फिल्म इंडस्ट्रीपासून 24 वर्षे राहिली दूर, कमी वयातच झाली होती विधवा, कठीण परिस्थिती वाढवले मुलांना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार शांतीप्रियाने 1991 मध्ये अक्षय कुमारसोबत 'सौगंध'  चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण तिचा हा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर तिने निवडक बॉलिवूड चित्रपट केले खरे, पण ती येथे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करु शकली नाही. गेल्या 24 वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर असलेली शांतीप्रिया पुन्हा एकदा चित्रपटांत परतू इच्छित आहे. यानिमित्ताने तिने DainikBhaskar.com सोबत बातचीत केली आणि आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टी शेअर केल्या. 


कमी वयात सुटली पतीची कायमची साथ..   
- बातचीतमध्ये शांतीप्रियाने सांगितले, '2004 मध्ये माझे पती सिद्धार्थ रेचे निधन झाले, त्याच्या अकाली जाण्याने कौटुंबिक आयुष्यच थांबून गेले होते. त्याच्या पश्च्यात मुलांची जबाबदारी माझ्यावर आली. त्यावेळी माझा मोठा मुलगा शुभम हा 10 वर्षांचा तर धाकटा मुलगा शिष्या 5 वर्षांचा होता.' 


- ती पुढे म्हणाली,  'आता दोन्ही मुले शिकून मोठी झाली आहेत. एक मॉडेलिंग तर दुसरा फिल्म मेकिंग आणि स्क्रिन रायटिंगचा कोर्स करतोय. मुले आता सेटल होत असल्याने मी इंडस्ट्रीत आता पुन्हा काम करु इच्छिते.' 


सिंगल पेरेंट्स आहे शांतीप्रिया
सिंगल पेरेंट्स असलेल्या शांतीप्रियाला एकटीने मुलांचे पालनपोषण करताना ब-याच अडचणी आल्या. या कठीण परिस्थितीत भाऊ आणि आई आणि थोरली बहीण भानूप्रियाने प्रत्येक पावलावर मदत केल्याचे ती सांगितले. याकाळात काही मालिका आणि चित्रपटांत छोट्या-मोठ्या भूमिका शांतीप्रिया साकारत होती. 


अक्षयकडून मदत मिळणार...
अक्षय कुमारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या शांतीप्रियाला अक्षय कुमारकडून काही मदत मिळाली का? याचे उत्तर देताना तिने सांगितले, 'मी आजवर स्वतःहून कुणासोबतही संपर्क साधला नाही. आता मी काम करायला तयार आहे. जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करेल तेव्हा नक्कीच अक्षय मदत करेल. आपली इंडस्ट्री मदत नक्की करते, पण स्वबळावर सगळं काही करण्यात वेगळी मजा असते. सध्या मला कुणाकडेही काम मागण्यात लाज वाटत नाहीये. मला अक्षयच नव्हे तर इतर कुणीही कामासाठी बोलावले तर मी आनंदाने ऑडिशन देईल.' 


- शांतीप्रियाने सांगितले, 'इंडस्ट्रीत आता पुर्वीपेक्षा बराच बदल आल्याचे मला ठाऊक आहे, पण संधीही तेवढ्याच आहेत. मी निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, कॉमेडी, सीरियस, आर्ट फिल्म, वेब सीरीज कुठल्याही माध्यमात काम करायला तयार आहे. मी प्रेक्षकांना वचन देते की, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, तोपर्यं मी ही इंडस्ट्री सोडणार नाही.' 


काजोलसोबत केलं होतं शांतीप्रियाच्या नव-याने काम...
शांतीप्रियाचे पती सिद्धार्थ रे व्ही. शांताराम यांचा नातू होते. त्यांनी 1992 मध्ये 'वंश' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ते 'तिलक' आणि 'मिलेट्रीराज' या चित्रपटांत झळकले. 


- सिद्धार्थ रे यांना लोक 'बाजीगर' चित्रपटातील दमदार रोलसाठी ओळकतात. त्यांनी चित्रपटात काजोलचा मित्र आणि इन्स्पेक्टर करण सक्सेनाची भूमिका वठवली होती. त्यांच्यावर चित्रीत झालेले 'छुपाना भी नहीं आता' हे गाणे बरेच गाजले होते. 


इनपुट- उमेश कुमार उपाध्याय