आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री शीन दास म्हणाली 'मी अभिनेत्री नसते तर पत्रकार नक्कीच झाले असते'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री शीन दास लवकरच मालिका 'दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ'मध्ये दिसणार आहे. या मुलाखतीत शीनने आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाविषयी गप्पा मारल्या...,

मी कमी वेळेत चांगली प्रतिमा बनवली...

आमतौर पर खरं तर, राजश्री प्रॉडक्शन आपल्या अभिनेत्रीला दुसऱ्यांदा संधी देत नाही. मात्र मला जेव्हा या मालिकेसाठी कॉल आला, तेव्हा विश्वास वाटत नव्हता. माझी आधीची मालिका 'पिया अलबेला' जास्त काळ चालली नाही तरीदेखील मी कमी वेळेत चांगली इमेज बनवली. त्यामुळे मला पुन्हा संधी िमळाली. यामुळे खूप खुश आहे, आताही चांगल्यात चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार.

आठवड्यात चार कार्यशाळेला हजर राहत होते...

या मालिकेसाठी ऑडिशन दिले, बऱ्याच कार्यशाळेला हजर राहिले. आधीच्या भूमिकेपेक्षा ही भूमिका वेगळी अाहे, त्यामुळे माझा लूकही वेगळा आहे. यासाठी खूप मेहनत घेतली. आठवड्यातून चार कार्यशाळेला हजर राहत होते. यात खूप काही शिकायला मिळाले. जास्तीत जास्त सराव करत होते. त्या कार्यशाळेत आपले संवाद आणि बॉडी लँग्वेजवर मेहनत घेतली. या मालिकेत काही िदग्गज अभिनेत्रीदेखील आहेत. त्यांच्या सोबत मला काम करायचे आहे, मनात थोडी भीती आहे, मात्र पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न करेन.

माझ्या पात्राप्रमाणेच मीदेखील छोट्या आणि मोठ्या शहराचा भेद मिटवू पाहत आहे...

या मालिकेविषयी बोलायचे झाले तर याची संकल्पना मला आवडली. छोट्या शहरातील एक मुलगी, तिला आई-वडील नाहीत, तिच्यावर बरीच जबाबदारी आहे, त्याबरोबरच तिचे स्वत:चे स्वप्नदेखील आहे, ते तिला पूर्ण करायचे आहे. अनेक छोट्या शहरातील मुलींना संधी मिळत नाही, असे मला वाटते.कारण आपण जेव्हा मोठ्या शहरात जातो तेव्हा तुम्ही कुठुन आलात हाच पहिला प्रश्न विचारला जातो. त्यानुसारच आपले परीक्षण केले जाते. मग तुम्ही कितीही मोठी डिग्री मिळवली असेल, पण आपण कोणत्या शहरातून आलोत हे पाहिले जाते. खरं तर, माझ्यापात्राप्रमाणेच मीदेखील मोठ्या आणि छोट्या शहराचा भेद मिटवू पाहत आहे. सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते, मात्र सुरुवात कुठून करावी कळत नव्हते...

मला पहिल्यापासूनच अभिनेत्री व्हायचे होते मात्र हे स्वप्न पूर्ण करण्याची सुरुवात कुठून करावी कळत नव्हते. मला काहीच माहीत नव्हते. मी जर्नलिज्मचा कोर्स केला आहे आणि दिल्लीत एका न्यूज चॅनलमध्ये इंटर्नशिप केले. या चॅनलचे ऑफिस जेथे होते तेथेच 'एयरलाइंस' नावाच्या शोचे शूटिंग सुरू होते. तेथे मी ऑडिशन दिले.
 

बातम्या आणखी आहेत...