आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : श्रद्धा कपूरला इंडस्ट्रीमध्ये १० वर्षे झाली आहेत. नुकताच तिचा स्ट्रीट डांसर थ्रीडी चित्रपट आला. यात तिने लहानपणीचा मित्र वरुण धवनसोबत काम केले आहे. यानंतर तिचा ‘बागी ३’ येणार आहे. त्यात शाळेतील ज्युनियर टायगर श्रॉफसोबत तिने काम केले.
बागी फ्रँचायझीमध्ये टायगर तर अॅक्शन करत राहतो. तू साहोमध्ये अॅक्शन दृश्य केली होती. या वेळी ‘बागी ३’मध्ये तुझी अॅक्शन दृश्ये असतील?
अॅक्शन तर कमीच आहेत. तूर्तास मला या चित्रपटाबाबत जास्त काही सांगता येणार नाही. टायगरसोबत तुझी ऑनक्रीन जोडी खूप चांगली दिसते, असे लोक म्हणतात तेव्हा खूप चांगले वाटते. वरुण हा दुसऱ्या शाळेत होता. तथापि, आम्ही समवयस्क आणि एकाच बॅचचे आहोत. टायगर माझ्यापेक्षा तीन वर्षे ज्युनिअर आहे. शाळेत मी त्याच्यापेक्षा उंच होते. तो बास्केटबॉलच्या कपड्यांमध्ये शाळेच्या आवारात धावत असे. अचानक मला पाहायचा तेव्हा साध्या-भोळ्या मुलाप्रमाणे मला हळू आवाजात हाय श्रद्धा असे म्हणायचा आणि मी प्रत्युत्तरात अत्यंत गंभीरपणे हं असे म्हणायची. तो खऱ्या आयुष्यातही खूप चांगला आहे. सेटवर तो प्रत्येकाशी बोलतो, प्रत्येकाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. अशा लोकांसोबत काम करायला खूप आवडते.
वरुण धवनसोबत पहिल्यांदा तू त्याच्या विरुद्ध भूमिका साकारली आहे. खऱ्या आयुष्यात तुम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहात. स्क्रीनवर त्याच्या पात्राविरोधात द्वेष कसा निर्माण करू शकलीस?
हे खरंच खूप कठीण होते. चित्रपटात मी इनायत नावाच्या मुलीचे पात्र साकारत होते. ते खूपच आक्रमक पात्र होते. खऱ्या आयुष्यात मी तशी नाही. वरुणसोबतही एक चांगली मैत्रिण म्हणूनच राहिले. तो खूपच चांगला माणुस आहे. सर्जनशील म्हणून तो स्वत:ला विकसित करू इच्छित आहे. त्याच्या सोबतच्या खूप आठवणी आहेत. इनायत ही तोंडावर प्रशंसा करणारी किंवा मग समोरासमोर टिका करणारी मुलगी आहे. एखाद्याच्या समोरच त्याला वाइट म्हणायला तिला आवडत नाही. ती तर एखाद्याच्या सुमार कामगिरीवरही त्याला हिंमत देते. सर्वकाही ठीक आहे, घाबरू नका, असे म्हणत त्याला धीर देते. माझी स्पर्धा केवळ स्वत:सोबतच होती. इनायत कधीच हार मानत नव्हती. तथापि, स्वत:च्या विरुद्ध स्वभावाच्या व्यक्तीचे पात्र साकारणे हीच तर अभिनयाची खरी मजा आहे.
तू टायगर आणि वरुण दोघांसोबतही काम केले आहे. दोघांमध्ये तुला किती फरक दिसतो?
दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे अॅक्शन करतात. टायगर हा खरंच प्रशिक्षित फायटर व जिम्नॅस्ट आहे. मार्शल आर्टही त्याला येते. या कलेचे त्याला लहानपणापासूनच वेड होते. त्यामुळे त्याच्या स्टाइल ऑफ अॅक्शनमध्ये फरक दिसून येतो.
तू आणि वरुण डान्स चित्रपटांशिवाय आणखी काही वेगळे करणार आहात का?
मला त्याच्यासोबत विनोदी चित्रपट करायचा आहे. तो पूर्णपणे विनोदी असावा आणि त्यात आम्हा दोघांची पात्रे पूर्णपणे वेड्यांची असावीत. तसेही मला डेव्हिड अंकलची कॉमेडी खूप आवडते. त्यात माझ्या वडिलांनीही अनेक भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे गोविंदा आणि सलमान यांनी जसे विनोदीपट केले आहेत, तसेच मलादेखील करायला आवडतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.