एक भ्रम : सर्वगुण सम्पन्न : रोमँटिक सीन केल्यानंतर ही अभिनेत्री पेरेंट्सला म्हणते - 'प्लीज आजचा एपिसोड पाहू नका' 

2011 मध्ये सुरु केले होते टीव्हीमध्ये करियर... 
 

दिव्य मराठी

Apr 28,2019 02:35:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : अशात सीरियल 'एक भ्रम : सर्वगुण सम्पन्न' मध्ये लीड रोल करत असलेली अभिनेत्री श्रेणु पारिख डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करू इच्छिते. एका एंटरटेनमेंट पोर्टलला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितले, "मला डिजिटल स्पेसवर डेब्यू करायला आवडेल." जेव्हा तिला विचारले गेले की, ती आतापर्यंत का थांबली आहे ? तर तिने उत्तर दिले, "मी डिजिटल स्पेसवर बोल्ड कंटेंटसाठी तयार नाहीये." तिने याचे कारणही सांगितले. ती म्हणाली, अशा सीन्सच्या शूटिंगमध्ये ती कम्फर्टेबल नाही होवू शकणार.

मम्मी-पापाला आपले रोमँटिक सीन पाहू देत नाही...
श्रेणु पुढे म्हणाली, "तुमचा विश्वास बसणार नाही, जेव्हाही एखादा रोमँटिक सीन शूट करते. तेव्हा निश्चितपणे मम्मी-पापाला फोन करते आणि सांगते, "प्लीज आजचा एपिसोड पाहू नका. मी अशा कंटेंटवर काम करू शकत नाही. एक अभिनेत्री म्हणून माझी एवढी एकच लिमिटेशन आहे." जेव्हा श्रेणुला विचारले गेले की, खरच तिचे फॅमिली मेंबर्स तिने रिक्वेस्ट केल्यानंतर तो एपिसोड पाहत नाहीत का ? तेव्हा ती म्हणाली, "नाही, बिलकुल नाही. ते तरीदेखील तो एपिसोड पाहतात."

जेव्हा वडिलांनी केले होते क्रिटिसाइज...
श्रेणुने सांगितले की, एकदा तिच्या वडिलांनी तिला क्रिटिसाइज केले होते. ते म्हणाले होते, 'बेटा असे केले नाही पाहिजे ?' जेव्हा तिला विचारले की, यावर तिने काय उत्तर दिले. तर ती म्हणाली, "मी काय उत्तर देणार होते, मला खूप विचित्र वाटले आणि मी म्हणाले, - डॅडी, प्लीज यार रोमांसविषयी बोलू नका." हे बोलता बोलता ती हसली.

2011 मध्ये सुरु केले होते टीव्हीमध्ये करियर...
श्रेणुने 2011 मध्ये सीरियल 'हवन' ने आपल्या टीव्ही करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने 'ब्याह हमारी बहू का', 'इस प्यार को क्या नाम दूं', 'एक बार फिर', 'दिल बोले ओबेरॉय' आणि 'इश्कबाज' सारख्या शोजमध्ये काम केले आहे.

X