आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्री श्वेता तिवारी म्हणाली, माझी मुलगी पलक खूप सकारात्मक आहे.... 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री श्वेता तिवारी नुकतीच सुरू झालेली आपली टीव्ही मालिका 'मेरे डॅड की दुल्हन'द्वारे पुनरागमन करण्यासाठी चर्चेत आहे. ही अभिनेत्री आपला तीन वर्षांचा मुलगा रेयांशसोबत वेळ घालवण्यासाठी सुटीवर होती. यासंदर्भात श्वेता सांगते, "माझी मुलगी पलकचा जन्म झाला होता तेव्हा मी तिच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवू शकत नव्हते. कारण कामामुळे मी खूप व्यग्र होते. त्यामुळे रेयांश झाला तेव्हा मी कोणताच प्रोजेक्ट केला नाही.'
मालिकेत श्वेता मजबूत हेतू असलेली महिला गुनीत सिक्काचे पात्र साकारात आहे. गुनीत आणि श्वेता यांच्यातील साम्याबाबत श्वेता म्हणाली, "आयुष्याप्रती गुनीतचा वेगळा दृष्टिकोन आहे. घरामध्ये आग लागली तरीदेखील ती तणावामध्ये राहणार नाही. आता घरात आग लागली तर आम्ही काय करू शकतो? त्यापेक्षा विझवण्याचे उपाय शोधले पाहिजेत, अशी तिची पहिली प्रतिक्रिया असेल. खरे सांगायचे तर मी खऱ्या आयुष्यामध्ये गुनीतसारखी नाही. मात्र, माझी मुलगी पलकचा स्वभाव गुनीतसोबत खूप मिळता-जुळता आहे. ती खूपच सकारात्मक मुलगी आहे.'
पलकबाबत श्वेता म्हणाली, "जर पलक आणि मी एका लांब रांगेत उभ्या आहोत आणि मागे उभी असलेली व्यक्ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल तर ती त्या व्यक्तीला सहजपणे पुढे जाण्यासाठी रस्ता करून देईल. याचा मला खूप राग आल्यावर रांग इतकी मोठी नाही आणि मग आपल्याला कुठे घाई आहे? मग त्याला जाऊ दे ना? असे म्हणत ती मला शांत करते. ती खूप निरागस आहे. मी गुनीतच्या पात्राची तयारी करत होते तेव्हा मी नेहमीच पलकचा सकारात्मक स्वभाव आणि स्मित हास्य आपल्या मनामध्ये साठवून ठेवत होते.'