• Home
  • News
  • Actress Shweta Tiwari's husband Abhinav Kohli arrested, accused of beating his wife and daughter

Bollywood / अभिनेत्री श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहलीला अटक, पत्नी आणि मुलीला मारहाण केल्याचा झाला आरोप

श्वेताने हाही आरोप केला आहे की, कोहली अनेकदा दारू पिऊन गोंधळ करायचा 

 

दिव्य मराठी वेब

Aug 12,2019 01:22:14 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री श्वेता तिवारीने आपला अभिनव कोहलीवर घरेलू हिंसाचाराचा आरोप करून त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्रकरणावर कारवाई करत रविवारी रात्री कोहलीला अटक केली आहे.

अभिनेत्री श्वेता आणि तिची मुलगी पलक रविवारी कांदिवलीच्या समता नगर पोलीस स्टेशनला पोहोचल्या आणि अभिनव कोहलीविरुद्ध दारू पिऊन त्यांना मारहाण केल्याची केस दाखल केली आहे. यादरम्यान श्वेता पोलीस स्टेशनमध्ये रडतच आली. श्वेताने हादेखील आरोप केला की, कोहली अनेकदा दारूच्या नशेत गोंधळ करतो. त्यानंतर कोहलीची चार तास विचारपूस केली गेली आणि रात्री त्याला उशिरा अटक केली गेली.

मुलीसोबत अभद्र प्रकार केल्याचाही आरोप...
आरोपानुसार, अभिनवने श्वेताची मुलगी पलकसोबत अभद्र भाषेचा वापर केला होता. श्‍वेताने अभिनववर मुलीबद्दल अश्‍लील वक्तव्य करणे आणि ऑक्टोबर 2017 मध्ये आपल्या मोबाइलवर मॉडल्‍सचे अश्‍लील फोटो दाखवून तिची शालीनता नष्‍ट करण्याचा आरोप लागला होता.

पहिल्या पतीसोबतही झाला होता असाच वाद...
पलक, श्‍वेता तिवारी आणि राजा चौधरीची मुलगी आहे. राजा चौधरी दारूच्या नशेत श्‍वेताला मारहाण करायचा. त्यानंतर श्‍वेताने राजापासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर 2013 मध्ये श्‍वेताने अभिनव कोहलीसोबत लग्न केले. दोघांनी 3 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर विवाह केला. दोघांचा अडीच वर्षांचा एक मुलगादेखील आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री आहे श्वेता...
श्‍वेता तिवारीने आपल्या करियरची सुरुवात टीव्ही सीरीयल 'कसौटी जिंदगी की' ने सुरुवात केली होती. यामध्ये तिने प्रेरणाची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त श्वेता अनेक चित्रपटांमध्येही दिसली होती. ती रियलिटी शो 'बिग बॉस 4' ची विनर होती.

X
COMMENT