आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्फर्म / 'मोगुल'मध्ये झळकणार सोनाक्षी सिन्हा, गुलशन कुमारच्या प्रेयसीची साकारणार भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः मी टू मोहिमेमुळे भूषण कुमारचा आगामी 'मोगुल' (वडील गुलशन कुमारचा बायोपिक) देखील रखडला आहे. या चित्रपटात आमिर खान अभिनय करणार होता आणि सहनिर्मितीही करणार होता. मात्र, दिग्दर्शक सुभाष कपूरचे नाव मी टू मोहिमेत आल्यामुळे त्याने हा चित्रपट सोडला. यानंतर सुभाषला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता चर्चा आहे की, दिग्दर्शकाचा शोध सुरू आहे, याबरोबरच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला देखील एका भूमिकेसाठी निवडण्यात आले आहे. 


70-80च्या दशकातील कहाणी... 
सूत्राच्या माहितीनुसार, या चित्रपटाची कथा ७० ते ८०च्या दशकावर आधारित आहे. त्यामुळे रेट्रो लूकमध्ये सुंदर दिसावी अशी हीरोइन त्यांना हवी होती, त्यामुळे सोनाक्षीची निवड करण्यात आली. यासाठी सोनाक्षीने होकार दिला आहे. मात्र, तिने साइन केला नाही. चित्रपटात तिची छोटी, पण महत्त्वाची भूमिका आहे. ती सध्या तारखांवर काम करत आहे.'


सोनाक्षी होणार गुलशन कुमारांची गर्लफ्रेंड... 
या चित्रपटात तीन अभिनेत्री आहेत. सोनाक्षी यात गुलशनच्या लग्नाच्या आधीच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसू शकते. चित्रपट पुढच्या वर्षी नाताळात रिलीज हाेऊ शकतो. 
 

बातम्या आणखी आहेत...