आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःला फिट ठेवण्यासाठी श्रीदेवीने घेतली होती 24x7 ची मेंबरशिप, 5 स्टार हॉटेलच्या जिममध्ये एकटी करायची वर्कआउट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आज (13 ऑगस्ट) श्रीदेवी यांची 55 वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला होता. श्रीदेवी त्यांच्या फिटनेस आणि जिमवर वर्षाला चार लाख रुपये खर्च करायच्या. खास गोष्ट म्हणजे, बॉलिवूडच्या इतर स्टार्सप्रमाणे श्रीदेवी यांनी स्वतःसाठी सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरची नेमणूक केली नव्हती. श्रीदेवी यांच्या एका निकटवर्तीयाने DainikBhaskar.com ला सांगितल्यानुसार, "श्रीदेवी यांनी जे. डब्ल्यू मॅरियट या फाइव्ह स्टार हॉटेलच्या जिमची मेंबरशिप घेतली होती. येथे त्या तेथील फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनात वर्कआउट करायच्या." 

 

जिममध्ये मिळत नाही मन्थली मेंबरशिप ...
- हॉटेलच्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, येथे वार्षिक मेंबरशिपसाठी 2.95 लाख रुपये भरावे लागायचे. येथे मन्थली मेंबरशिप मिळत नव्हती. 
- जर एखाद्याने पर्सनल ट्रेनर ठेवला तर त्यासाठी वेगळे 95 हजार रुपये द्यावे लागायचे. ही मेंबरशिप 24/7 साठी असते.
- दोन्ही अमाउंट जोडून श्रीदेवी 3.90 लाख रुपये जिमवर खर्च करत होत्या.

 

मुलगी खर्च करते 8 लाख रुपये

- श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनस यास्मिन कराचीवालाकडून ट्रेनिंग घेत आहे. आपल्या फिटनेसवर जान्हवी 8 लाख रुपये खर्च करते.

- सूत्रांच्या माहितीनुसार, यास्मीन दरदिवशी Pilates च्या एका सेशनसाठी 5500 रुपये घेते. जर एखाद्याने मन्थली पॅकेज घेतले तर त्यामध्ये Pilates चे 12 सेशन असतात. अर्थातच वर्षभरासाठी केवळ Pilates या व्यायाम प्रकारासाठी 66 हजार रुपये खर्च करावे लागतात.

- 'सैराट' या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक 'धडक'द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी जान्हवी आपल्या फिटनेसवर वर्षभरासाठी आठ लाखांचा खर्च करते. 

बातम्या आणखी आहेत...