Bollywood / श्रीदेवी यांच्या मेणाच्या पुतळ्याचे झाले अनावरण, आईला एकसारखी न्याहाळताना दिसली जान्हवी

हा पुतळा 20 लोकांच्या एक्सपर्ट टीमने तयार केला आहे

Sep 04,2019 12:08:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : सिंगापुरच्या मॅडम तुसाद म्यूझिअममध्ये फर्स्ट फीमेल सुपरस्टार श्रीदेवी यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर आणि दोन्ही मुली जान्हवी-खुशी हजर होत्या. या पुतळ्याला 1987 मध्ये आलेला 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातील प्रसिद्ध हवा हवाई गाण्यातील लुक दिला गेला आहे.

असा झाला आहे तयार...
हा पुतळा 20 लोकांच्या एक्सपर्ट टीमने तयार केला आहे. या आर्टिस्ट्सने श्रीदेवी यांचे कुटुंबीय आणि मित्रांशी बोलून विशेष माहिती गोळा केली होती. त्यानंतर त्यांचे एक्सप्रेशन, मेकअप आणि कपडे रीक्रिएट केले गेले. मेकअप, ज्वेलरी, क्राउन आणि ड्रेस विशेष 3डी प्रिंट दिले गेले आहे.

X