आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Surveen Chawla Says 'Not Once But I Have Been A Victim Of Casting Couch Five Times'

अभिनेत्री सुरवीन चावला म्हणाली - 'एकदा नव्हे तर मी पाच वेळा झाले आहे कास्टिंग काउचची शिकार' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावलाने धक्कादायक खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये आजही सर्रास लैंगिक छळ होत असल्याचे म्हणत तिने पुन्हा एकदा मीटू चळवळीला हवा दिली  आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले, मला एकदा नव्हे तर पाच वेळेस कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला...

सुरवीनने सांगितले, मी पाच वेळेस कास्टिंग काउचची शिकार झाले. त्यात तीनदा मला दक्षिणेत कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. सर्वात आधी दक्षिणेच्या एका दिग्दर्शकाने मला बैठकीसाठी बोलावले. ते म्हणाले, आपल्यात भाषेची अडचण आहे. मी तुझ्या शरीराचे एक-एक इंच पाहू इच्छितो. ते ऐकून मी स्तब्ध झाले होते. लगेच तेथून परत आले आणि नंतर कधीच त्यांचा फोन उचलला नाही.

त्यानंतर पुन्हा एकदा दक्षिणेच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाने मला अप्रोच केले. ते हिंदी बोलू शकत नव्हते तेव्हा त्यांच्या जवळच्या एका हिंदी बोलणाऱ्या मित्राला त्यांनी बोलायला सांगितले, मॅम तुमच्या आणि माझ्यात भाषेची अडचण आहे. तर दिग्दर्शक सर तुम्हाला आणखीन जवळून पाहू इच्छित आहेत, फक्त चित्रपट संपेपर्यंत. मीदेखील त्यांना फटकन उत्तर दिले, तुमचा काही तरी गैरसमज झाला आहे, मी येथे फक्त प्रतिभेच्या बळावर काम करायला आले आहे. त्यानंतर मी तो चित्रपट केेला नाही. सुरवीनने पुढे सांगितले, आजही हा सर्व प्रकार सुरू आहे. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये एका दिग्दर्शकाने माझ्यासोबत अपशब्दाचा वापर केला होता. तर एकाने माझी मांडी पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. या लाेकांची नावे आधीही मीटू चळवळीमध्ये आली आहेत.

पुन्हा पसरू शकते मीटूचे वादळ...
सुरवीनच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर अनेक मुली या लैंगिक छळाविरुद्ध बोलू शकतील. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तनुश्री दत्ताने स्वत:चा अनुभव सांगून या इंडस्ट्रीत मीटूचे वादळ निर्माण केले होते. एकीची हिम्मत पाहून दुसऱ्या अभिनेत्री समोर येऊन बोलू शकतील.