Home | Gossip | Actress Tamanna Bhatia bought sea facing apartment, by paying double payment Rs 16.60 crore

अभिनेत्री तमन्ना भाटियाने दुप्पट किंमत देऊन खरेदी केले सी-फेसिंग अपार्टमेंट, बिल्डरला दिले 16.60 कोटी रुपये

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 25, 2019, 12:34 PM IST

2005 पासून चित्रपटात सक्रिय आहे तमन्ना... 

 • Actress Tamanna Bhatia bought sea facing apartment, by paying double payment Rs 16.60 crore

  बॉलिवूड डेस्क : 'बाहुबली' सारखे चित्रपटातील अभिनेत्री तमन्ना भाटियाने मुंबईमध्ये सी-फेसिंग अपार्टमेंट खरेदी केले आहे. रिपोर्ट्सनुसार, तिने दुप्पट किंमत यासाठी मोजली आहे. बिल्डर समीर भोजवानीकडून खेर्डी केलेल्या या अपार्टमेंटची किंमत 80,778 रुपये प्रति चौरसफूट आहे. मात्र येथून केवळ 500 मीटरच्या अंतरावर प्रॉपर्टीची किंमत 30,000-40,000 रुपये प्रति चौरसफूट आहे.

  तमन्नाने खर्च केले 16 कोटी रुपये...
  रिपोर्ट्सनुसार, तमन्नाने या फ्लॅटसाठी बिल्डरला 16.60 कोटी रुपये मोजले आहेत. याव्यतिरिक्त 99.60 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटीवर खर्च झाले आहेत. हे अपार्टमेंट वर्सोवा-जुहू लिंक रोडच्या बेव्यू नावाच्या 22 मजली इमारतीतील 14 व्या फ्लोअरवर आहे.

  अपार्टमेंटचे वैशिष्ठ्य...
  रिपोर्ट्समध्ये पुढे सांगितले गेले आहे की, "अपार्टमेंटचे वैशिष्ठ्य हे आहे की, याच्या प्रत्येक बाजूने समुद्राचा किनारा दिसतो. याव्यतिरिक्त अभिनेत्री आपल्या हिशेबाने याचे इंटेरियर करून घेऊ शकते." तमन्ना आपल्या नव्या घराच्या इंटेरियरवर 2 कोटी रुएए खर्च करण्याचे प्लॅनिंग केले आहे.

  2005 पासून चित्रपटात सक्रिय आहे तमन्ना...
  मुख्य अभिनेत्री म्हणून तमन्ना भाटियाने पहिल्यांदा हिंदी चित्रपट 'चांद सा रोशन चेहरा' (2005) मध्ये दिसली होती, जो बॉक्सऑफिसवर फ्लॉप झाला होता. 2005 मधेच तिने तेलगु इंडस्ट्रीमध्ये 'श्री' ने डेब्यू केला होता. 2006 मध्ये तिने केडीच्या माध्यमाने तामिळ चित्रपटांत एंट्री घेतली. तमन्ना साउथ इंडियन चित्रपटांची सुपरस्टार आहे. पण हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये तिला आपले स्थान बनवता आले नाही.

  बॉलिवूडमध्ये तमन्नाने केले हे चित्रपट...
  'चांद सा रोशन चेहरा' नंतर तमन्नाने 'हिम्मतवाला' (2013), 'हमशकल्स' (2014), 'एंटरटेनमेंट' (2014), 'तूतक तूतक तूतिया' (2016) आणि 'खामोशी' (2019) मध्ये दिसली होती. पण यातील एकदेखील चित्रपट बॉक्सऑफिसवर यश मिळवू शकला नाही.

 • Actress Tamanna Bhatia bought sea facing apartment, by paying double payment Rs 16.60 crore
 • Actress Tamanna Bhatia bought sea facing apartment, by paying double payment Rs 16.60 crore

Trending