आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शक सुजय डहाकेच्या जातीवाचक वक्तव्याला अभिनेत्री तेजश्री प्रधानचे सडेतोड उत्तर, म्हणाली...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  'शाळा', 'फुंतरु', 'आजोबा' आणि अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'केसरी' या चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाकेने सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर अनेक स्तरातून त्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुजयला टोला लगावला आहे.  'मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे... पण  काम आहे माझ्याकडे. आणि गेली 'य' वर्ष!! याला टॅलेंट म्हणूया का?', अशा आशायची पोस्ट तिने आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केली आहे.

सध्या अनेक वाहिन्यांवर सुरू असलेल्या मराठी मालिकांमध्ये ब्राह्मणच मुली प्रमुख भूमिकांमध्ये दिसतात, असे वक्तव्य सुजयने केले होते. यावेळी बोलताना त्याने एक उदाहरणही दिले होते. “एक व्हाईट कॉलर क्लास आहे तो याला कंट्रोल करतोय आणि आपल्याला मराठी चित्रपटसृष्टी किती छान चाललीये असे वाटते,” असे तो म्हणाला होता. 

बातम्या आणखी आहेत...