आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केला आरेमधील झाडांच्या कत्तलीचा निषेध, इंस्टाग्रामवर शेअर झाला आहे फोटो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई प्रशासनाने अर्ध्या रात्री आरे फॉरेस्टमधील सुमारे 400 झाडे कापली. बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रशासनाच्या या वर्तनाबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. यातीलच एक मराठी सिनेसृष्टीतील नायिका तेजस्विनी पंडितने 'गावदेवी'च्या रुपातला फोटो शेअर केला आहे. तेजस्विनीचा हा फोटो झाडांच्या या कत्तलीचा निषेध करणारा आहे. हा फोटो राजश्री मराठीने आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. फोटोसोबत कॅप्शन दिले गेले आहे, "शहरीकरणामुळे वसुंधरेची अनेक झाडं ह्या निर्दयी माणसाने कापली. ह्याचं जीवंत उदाहरण म्हणजे 'आरे'.आरे परिसराच्या सद्यस्थितीवरती भाष्य करणारे चित्रण @tejaswinipandit ने 'गावदेवी'च्या रुपात मांडले."