आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर काँग्रेसने उर्मिला मातोंडकराला उतरविले लोकसभेच्या रिंगणात; भाजपच्या गोपाल शेट्टींचे मोठे आव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून बॉलिवूड अभिनेत्री आणि 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरला अखेर उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात काँग्रेसने उर्मिला हिला लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे.

 

उर्मिला मातोंडकर हिने बुधवारी (ता.27) राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिला उत्तर-मुंबईतून लोकसभा निवडणुकीचे तिकिट मिळणार अशी आधीपासूनच चर्चा होतर. परंतु, उत्तर-मुंबई हा भाजपचा गड मानला जातो. उर्मिलासाठी ही लढत सोपी नाही. उत्तर-मुंबई मतदार संघात गुजराती-मराठी मतांचे समीकरण जवळपास समान आहे. दोन्ही मिळून  60 टक्के मते आहेत. 40 टक्क्यांमध्ये उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांचा समावेश आहे.

 

गुजराती मतदारांचा भाजपला सपोर्ट..
उत्तर-मुंबईतील गुजराती मतदारांचा भाजपला सपोर्ट आहे. त्यात काँग्रेसने उर्मिलाच्या रुपात मराठी उमेदवार दिला आहे. उत्तर भारतीयाचा मुंबई काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना पाठिंबा आहे. उत्तर-मुंबईतून संजय न‍िरुपम एकदा निवडणून आले होते. मात्र, यंदा संजय निरुपम उत्तर-पश्चिम मुंबईतून रिंगणात उतरले आहे. उर्मिला ही बॉलिवूड अभिनेत्री असल्याने लाभ मिळेल, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे.

 

गोपाल शेट्टींचे उर्मिलासमोर मोठे आव्हान..
उत्तर-मुंबईत काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर आणि भाजपचे उमेदवार गोपाल शेट्टी यांच्या खरी लढत दिसणार आहे. भाजपचा गड मानला जाणार्‍या उत्तर मुंबईतून उर्मिलाला किती मते मिळतात हे आता सांगणे कठीण आहे. परंतु, तिच्यामुळे काँग्रेस चर्चेत आले आहे, हे मात्र खरे आहे.

 

अनेक सेलेब्सच्या संपर्कात होती काँग्रेस

2004 मध्ये अभिनेता गोविंदाने याने उत्तर मुंबईतून काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे बॉलिवूड सेलेब्सला या मतदार संघात यश मिळते, असा कयास काँग्रेसने लावला आहे. उर्मिलाशिवाय अमीषा पटेल, डिंपल कपाडिया, केतकी दवे यांच्याशी काँग्रेसने संपर्क केला होता. याआधी चित्रपट निर्माता महेश मांजरेकर यांच्याही चर्चा करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...