आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actress Vidya Balan Revealed About Casting Couch, Saying 'The Director Wanted To Come Into My Room And Talk To Me'.

अभिनेत्री विद्या बालनने केला कास्टिंग काऊचबद्दल खुलासा, म्हणाली - 'दिग्दर्शकाला माझ्या रूममध्ये येऊनच माझ्याशी बोलायचे होते'  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच हे काही नवीन नाही. परंतु बऱ्याचदा कुणी याविषयी बोलू शकत नाही तर कुणी बोलत नाही आणि मोठ्या कलाकारांद्वारे तर याबद्दल क्वचितच बोलले जाते. अभिनेत्री विद्या बालन हिने तिच्या सिनेसृष्टीतील सुरुवातीच्या प्रवासातील एक आठवण सांगितली. तिच्या कारकीर्दीतील एक त्रासदायक टप्पा आठवताना विद्याने सांगितले की, तीदेखील या वाईट अनुभवातून गेली आहे. 
 
पिंकव्हीलाशी बोलताना विद्याने सांगितले की, कसा एका दिग्दर्शकाने तिच्यासमोर जास्त हुशारी करण्याचा प्रयत्न केला होता. विद्या म्हणाली कि, "मला आठवते एक दिवस मी चेन्नईमध्ये होते आणि हा दिग्दर्शक मला भेटायला आला. मी म्हणाले की, चला आपण कॉफी शॉपवर बसू आणि तो मला वारंवार सांगत राहिला की, त्याला बोलायचे आणि त्यासाठी आपण रूममध्ये बसले पाहिजे. मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवला आणि तो पाच मिनिटांत निघून गेला. मला आज अचानक हे आठवले जेव्हा आज मी याबद्दल बोलते आहे." 
 
पुढे आणखी एक घटना सांगताना ती म्हणाली की, ती बॉडी शेमिंगच्या अनुभवातूनही गेली आहे आणि त्याचा तिच्यावर खूप गंभीर परिणाम झाला. "कोणीतरी असे लिहिले होते की 'अशा प्रकारचे ड्रेसिंग कर. तिला बाहेर पडण्याची काहीएक गरज नाही. तिने घरातच राहावे'. याचा माझ्यावर इतका परिणाम झाला होता की मला बराच काळ तशी स्वप्न पडायची आणि मी चिडायचे." 

बातम्या आणखी आहेत...