Home | Flashback | Actress Vimi Tragic Story

अभिनेत्रीची शोकांतिका : स्टार झाल्यानंतर 10 वर्षांत रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्ये घेतला अखेरचा श्वास, हातगाडीवरुन नेण्यात आले होते पार्थिव

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 12:28 PM IST

अखेरच्या दिवसात तिची परिस्थिती एवढी हलाखीची होती, की हातगाडीवर लोटत तिचे पार्थिव स्मशानात नेले होते.

 • Actress Vimi Tragic Story

  एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडमध्ये अनेक असे स्टार्स झाले आहेत, ज्यांनी जीवनातील शेवटचा काळ आर्थिक तंगीत घालवला आहे. अॅक्ट्रेस विमीची कथाही काहीशी अशीच आहे. सुनील दत्त आणि शशी कपूरसारख्या स्टार्ससोबत काम केलेली ही अॅक्ट्रेस दारुच्या व्यसनापायी वेश्या बनली होती, असे म्हटले जाते. एवढेच नाही तर अखेरच्या दिवसात तिची परिस्थिती एवढी हलाखीची होती, की हातगाडीवर लोटत तिचे पार्थिव स्मशानात नेले होते. आम्ही बोलतोय ते 1967 मध्ये रिलीज झालेल्या हमराज चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या आणि पहिल्याच चित्रपटातून स्टार झालेल्या अभिनेत्री विमीविषयी. हमराज या चित्रपटात सुनील दत्तसोबत विमीने काम केले होते. चित्रपटातील गाणी जबरदस्त हिट झाली होती. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर विमीला 10 चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली होती. पण तिचा अखेरचा काळ अतिशय वेदनादायी होता.

  शिक्षणानंतर लगेच केले लग्न
  - लहानपणापासून अॅक्टिंगचा छंद असलेल्या विमीने शिक्षण पूर्ण होताच कोलकात्यातील बिझनेसमन शिव अग्रवालसोबत तिने लग्न केले होते. विमीचे आईवडील या लग्नाच्या विरोधात होते, असे सांगितले जाते. विमी ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी होती. तर शिव यांचे कुटुंब श्रीमंत व्यावसायिक होते. त्यामुळे विमीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता.

  एका रात्रीत बनली स्टार..
  - विमीचे अॅक्ट्रेस बनण्याचे संपूर्ण श्रेय म्युझिक डायरेक्टर रवी यांना जाते.
  - विमी आणि रवी यांची भेट कोलकाताच्या एका पार्टीमध्ये झाली. रवीने विमी आणि तिच्या पति शिवला मुंबई येथे इनवाइट केले.
  - त्यावेळी विमी दोन मुलांची आई होती.

  असा मिळाला 'हमराज' चित्रपट
  - विमी मुंबईला पोहोचल्यानंतर रवीने तिची भेट डायरेक्टर बी. आर. चोपडांसोबत घालून दिली.
  - चोपडा यांनी तिला 'हमराज' चित्रपटात लीड अॅक्ट्रेसम्हणून साइन केले.
  - या फिल्ममध्ये राजकुमार, सुनी दत्त आणि मुमताजसुध्दा प्रमुख भूमिकेत होते.
  - 'हमराज' सुपरहिट ठरला आणि आणि विमी एका रात्रीत सुपरस्टार झाली.
  - 'हमराज' नंतर विमीने अशोक कुमार, निरुपा रॉयसोबत 'आबरु', पृथ्वीराज कपूर आणि आय एस जौहरसोबत 'नानक नाम जाहज है', शशि कपूरसोबत 'पतंगा' आणि 'वचन' सारख्या चित्रपटांत काम केले. जया बच्चन आणि धर्मेंद्र स्टारर 'गुड्डी' मध्ये विमीचा कॅमियो होता.

  सासरचे होते अॅक्टिंगच्या विरोधात
  - विमी बॉलिवूडच्या हिट अॅक्ट्रेसेसच्या लिस्टमध्ये आली होती.
  - तिचे सासरचे लोक मात्र अभिनय करण्याच्या निर्णयामुळे खुश नव्हते.
  - विमीच्या सासू-सास-यांनी तिच्या पतिला संपत्तीमधून बेदखल केले होते.

  दारात लागायची निर्मात्यांची रांग

  - दोन्ही मुलांना कोलकातामध्ये सोडून विमी आणि शिव मुंबईमध्ये शिफ्ट झाले.
  - आता विमी कुटुंबामध्ये एकटीच कमावणारी होती.
  - त्या काळात तिच्या दारात प्रोड्यूसर्सची लाइन लागत होती आणि ती एका फिल्मसाठी 3 लाख रुपये चार्ज करायची, असे सांगितले जाते.

  चित्रपट फ्लॉप झाल्याने उध्वस्त झाली..

  - त्यानंतर विमीचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आणि तिच्याकडे पैशाची कमतरता जाणवू लागली.
  - आर्थिक चणचणीमुळे तिला जुहू येथील बंगला सोडावा लागला. मुंबईच्या सर्वसामान्य भागात ती राहायला लागली होती.
  - विमीचे पति खुप दारु प्यायला लागले होते. एवढेच नाही तर पैशांसाठी विमीवर छोट्या प्रोड्यूसर्ससोबत काम करण्याचा दबाव ते आणत होते.
  - हळू-हळू विमी आणि शिवच्या नात्यात दुरावा येऊ लागला आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

  पतिपासून वेगळी होऊन डिप्रेशनमध्ये आली विमी
  - पतिपासून वेगळी झाल्यानंतर विमी टेंशनमध्ये राहू लागली. त्याचा परिणाम तिच्या करिअरवरही झाला.
  - त्या काळात तिला जे चित्रपट मिळाले ते सर्व फ्लॉप ठरले आणि हळू-हळू विमीवरील कर्ज वाढत गेले.
  - पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ उध्वस्त झाल्याचे दुःख तिला सहन झाले नाही आणि तिने दारु पिण्यास सुरुवात केली.
  - त्या काळात विमिकडे दारु प्यायला पैसे नसल्याने ती पैशासाठी वेश्या व्यवसायात ओढली गेली होती, असेही सांगितले जाते.
  - पैसे नसल्याने नाइलाजाने विमी स्वस्त मिळणारी दारु प्यायला लागली होती.

  जनरल वॉर्डमध्ये होती दाखल
  - स्वस्त दारु प्यायल्याने विमीचे लिव्हर पुर्णपणे खराब झाले होते. उपचारासाठी तिच्याकडे पैसे नव्हते.
  - जीवनातील अखेरच्या काळात ती मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. पैसे नसल्याने तिला जनरल वॉर्डमध्ये अॅडमिट केले होते.
  - 22 ऑगस्ट 1977 ला नानावटीमध्ये विमीचे निधन झाले. पण तिचे कोणीची जवळचे त्याठिकाणी नव्हते.

  अंत्यसंस्काराला पोहोचले होते फक्त 9 जण
  - 22 ऑगस्ट 1977 रोजी वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी मुंबईतील नानावटी रुग्णालयात विमीचे निधन झाले होते. त्यावेळी तिला खांदा द्यायला कुणीही नव्हते. निर्माते तेजनाथ जार यांनी सांगितले होते, की तिचे पार्थिव एका हातगाडीवर ठेऊन स्मशानभूमीपर्यंत पोहचवण्यात आले होते. तिच्या अंत्यविधीला फक्त 9 जण उपस्थित होते. यापैकी दोन फिल्म इंडस्ट्रीतून होते. एक स्वतः तेजनाथ आणि दुसरे एस. डी. नारंगचे भाऊ. विमीचे पती आणि मुले तिच्या अंत्य संस्काराला आले नव्हते.

Trending