आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिक शेती करणार अभिनेत्री यामी गौतम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘बदलापुर’, ‘काबिल’, ‘विकी डोनर’, ‘उरी’ अशा उत्कृष्ट चित्रपटांतून लाखो-कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री यामी गौतम आता व्यावसायिक शेती करण्याचा विचार करत आहे. यासाठी ती लोकांकडून माहिती घेत आहे. ती लवकरच मुंबईवरुन आपले वडिलोपार्जित शहर विलासपूर, हिमाचल प्रदेश जाणार आहे. तेथे ती व्यावसायिक शेती करणार आहे. यामी तेथे स्थानिक शेतकऱ्यांना भेटून आधुनिक शेती करण्यावर भर देणार आहे. यामी नेहमीच याविषयी बोलत असते. सध्या प्रत्येक खाण्या-पिण्याच्या पदार्थात भेसळ होत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करणे चांगला पर्याय आहे, असे ती म्हणते.  शेतीतही रोज नवीन उपकरण येत आहेत. याचा फायदा घेत संेद्रिय शेती करायला हवी आणि यासाठी शेतकऱ्यांना हवी ती मदत करायला हवी, त्यामुळे आपणही गावातील शेतकऱ्यांसोबत मिळून व्यावसायिक शेती करण्याचा विचार करत आहोत, असे ती म्हणते. विलासपुरमध्ये राहून तेथील शेतकऱ्यांना ती शेद्रिंय शेती करण्याविषयी मार्गदर्शन करणार आहे.  यामी नेहमीच याविषयी बोलत असते, त्यामुळे ती या शेतीकडे वळली आहे. तिने आपल्या वडिलोपार्जित गावाची या व्यवसायासाठी निवड केली.

बातम्या आणखी आहेत...