गोव्यात अभिनेत्री झरीन / गोव्यात अभिनेत्री झरीन खानच्या कारला अपघात, बाइकस्वाराचा जागीच मृत्यू; अॅक्ट्रेस सुद्धा जखमी

Dec 13,2018 05:57:00 PM IST

पणजी - बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान हिच्या कारचा गोव्यात मोठा अपघात झाला आहे. तिच्या कार आणि एका बाइकमध्ये जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत बाइकस्वाराचा मृत्यू झाला. तसेच झरीन खान स्वतः देखील जखमी आहे. तिला जखमी अवस्थेत पणजीतील एका खासगी रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना गोव्यातील मापूसा परिसरात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे.

गोव्यात हॉलिडेवर होती अभिनेत्री

सलमान खानसोबत वीरमध्ये डेब्यू करणारी अॅक्ट्रेस हाउसफुल आणि हेट स्टोरीनंतर चित्रपटांपासून दूरच आहे. ती सध्या गोव्यात सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती. संध्याकाळी आपल्या कारमध्ये निघाली असताना समोरून येणाऱ्या बाइक आणि तिच्या गाडीचा मोठा अपघात घडला. कार आणि बाइक दोन्हीची स्पीड जास्त होती. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बाइकस्वाराचे नाव नितेश गोरल (30) असे होते. अपघातावेळी त्याने हेलमेट घातलेला नव्हता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गोवा पोलिस या घटनेची सविस्तर चौकशी करत आहे. सोबतच घटनास्थळाचा सीसीटीव्ही सुद्धा चेक केला जात आहे.

X