आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशारीरिक आणि मानिसक समस्यांपासून दिलासा देण्यात अॅक्युप्रेशर थेरेपीही खूप फायद्याची आहे. मात्र, शरीराच्या योग्य सांध्यावर अॅक्युप्रेशर केले तरच लाभ मिळते. जाणून घेऊया तणाव दूर करण्यासाठी शरीराचे अॅक्युप्रेशर बिंदू-
दिवसभराचा संपूर्ण तणाव खांदे आणि मानेच्या स्नायुंमध्ये एकत्र होतो. खांदे आणि मानेच्या मिलन िबंदुवर प्रेशर बनवल्यास यापासून आराम मिळू शकतो. कार्यालयात डेस्कवर बसल्या-बसल्या थोडे मागच्या बाजूने झुका आणि दोन बोटांनी जिथे मान कवटीला मिळते त्या जागेची २० सेकंदांपर्यंत मसाज करा. यामुळे रिलेक्स वाटते.
अमाशय नाभीच्या वर असते. अनेक रिफ्लेक्सोलॉजिस्ट या बिंदूचा वापर करणे पसंत करतात. इथे अॅक्युप्रेशरद्वारे होणारी हालचाल छाती आणि डायफ्रामला तणावापासून मुक्त करते. यामुळे श्वास घेण्याची प्रक्रिया सुधारते.
मेंदूला आराम मिळवून देण्यासाठी हा बिंदू एकदम योग्य आहे. असे मानले जाते की, अग्नाशय (पॅनक्रियाज) बरे करण्यासाठी हा सर्वात चांगला अॅक्युप्रेशर पॉइंट आहे. पायाच्या अगदी मध्यभागी असलेला हा पॉइंट तणाव कमी करतो आणि शरीराच्या क्रियांवर लक्ष देण्यामध्ये व्यक्तीची मदत करतो.
हातांवर दाब देताच तणावापासून आराम मिळतो. हा महत्त्वपूर्ण ऊर्जा चॅनेलपैकी एक आहे. हा बिंदू हृदय, यकृत, अग्नाशयाला प्रभावित करतो. ज्या लोकांना तणाव जाणवतो त्यांच्यामध्ये बहुतांश यकृतामध्ये एकत्र होतो. हा भाग दाबल्याने खूप आराम मिळतो.
रिफ्लेक्सोलॉजी आणि अॅक्युपंक्चरसाठी हा बिंदू शरीराच्या उत्तम स्पाॅट्सपैकी एक मानला जातो. तणाव आणि थकवा शरीरामध्ये उलटा ऊर्जा प्रवाह तयार करतात. अशा स्थितीमध्ये अॅक्युप्रेशर थेरपी अत्यंत उपयुक्त ठरते. यामुळे ऊर्जेचा प्रवाह सुधारतो. तसेच ऊर्जा योग्य दिशेने घेऊन जाण्यासोबतच ही थेरपी मानसिक एकाग्रतादेखील वाढवते. या बिंदूवर अॅक्युप्रेशर केल्याने तणाव गायब होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.