आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून पेटलेल्या वादाचे देशभर तीव्र राजकीय पडसाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी/ मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस करण्याचे आश्वासन भाजपने महाराष्ट्रात निवडणूक जाहीरनाम्यात दिल्यानंतर देशभर यावरून वाद पेटला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी याविरुद्ध आक्रमक होत तीव्र विरोध सुरू केलेला असताना माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मात्र या विषयावर थेट विरोध किंवा समर्थन न करता इंदिरा गांधी यांनी सावरकरांवर पोस्टाचे तिकीट काढले होते, असे सांगितल्याने विरोध करणाऱ्यांना धक्काच बसला. दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याचा गौरव केला. वाराणसी येथे एका जाहीर सभेत बोलताना शहा म्हणाले, “सावरकर नसले असते तर १८५७ च्या उठावाची इतिहासात नोंदच घेतली गेली नसती.’

पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे नाव सावरकरांनी दिले
वाराणसीत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी सावरकरांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. काशी हिंदू विद्यापीठात एका कार्यक्रमात ते म्हणाले, सावरकर नसले असते तर १८५७ च्या उठावाची कधीच स्वातंत्र्यलढा म्हणून इतिहासात नोंद झाली नसती. सावरकरांनीच या उठावाला पहिला स्वातंत्र्यलढा, असे नाव दिले आणि इतिहासात ती नोंद झाली. 

... सावरकरांच्या ‘त्या’ प्रतिमेला समर्थन नाही
मुंबईत सावरकरांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सांगितले की, सावरकरांची जी प्रतिमा रंगवली गेली त्याला काँग्रेसचे कधीच समर्थन नव्हते, नाही. परंतु सावरकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पोस्टाचे तिकीट काढले होते. सावरकरांना अभिप्रेत हिंदुत्ववादाचे आम्ही कधीच समर्थन केलेले नाही.

हा तर माफीवीराला सन्मान देण्याचा प्रयत्न
^स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्व अर्पण करून जे वीर फासावर गेले त्या भगतसिंगांना भारतरत्न दिला नाही. मात्र, माफीवीराला हा सन्मान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मूळ विषयांवरून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. 
- कन्हैयाकुमार
 

काँग्रेससोबत ओवेसीही मैदानात :  
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी नथुराम गोडसे यालाच भारतरत्न का देत नाही, असा खोचक प्रश्न विचारला होता. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसींनीही अशीच टीका केली. तर, काँग्रेसचे दिग्विजयसिंह यांनी अलिराजपूर येथे बोलताना सावरकारांचे स्वातंत्र्य आंदोलन व माफीनामा देऊन त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा माफ करून घेतल्याचे दोन पैलू सांगत टीका केली.

बातम्या आणखी आहेत...