आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हाला मुस्लिम मते मिळाली नाही, त्यामुळे एमआयएम साेबत नसण्याचा काहीच परिणाम हाेणार नाही : अॅड. प्रकाश आंबेडकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाडच्या चवदार तळ्याआधी शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदना करून अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला  रायगडावरून प्रारंभ होत आहे. लोकसभा निवडणुकीपासून राज्यातील राजकारणात महत्त्वाचा घटक ठरलेल्या या आघाडीने विधानसभा निवडणुकीत व्यूहरचनाही बदलली. ३० टक्के मायक्रो ओबीसी समाज घटकांसोबत ‘मराठा’ हेदेखील वंचितच असल्याची भूमिका घेऊन यांनी या मतदारांनाही साद घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य अलुतेदार-बलुतेदारांचे होते, त्यांचीच सत्ता स्थापन करणे, हेच वंचित बहुजन आघाडीचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले.


प्रश्न : रायगडावरून प्रचाराची सुरुवात, ही बदललेली व्यूहरचना आहे का? 
आंब
ेडकर : होय, महाराजांना अभिप्रेत असलेले बहुजनांचे, रयतेचे राज्य आम्हाला पुन्हा आणायचे आहे. त्या वेळचे प्रस्थापित महाराजांसोबत नव्हते. ते निझामासोबत होते. महाराजांनी मावळ्यांची सत्ता आणली. आम्हाला तीच आणायची आहे. म्हणून रायगडावरून प्रचार सुरू करत आहोत. 


प्रश्न : शाळेच्या दाखल्यावरून जात काढा, असे आवाहन करणारे प्रकाश आंबेडकर आता जातनिहाय उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत?
आंबेडक
र : जात जाणं हा एक वेगळा लढा आहे आणि लोकशाहीचं सामाजिकीकरण हा वेगळा. आम्ही कोणत्या समाजाला प्रतिनिधित्व देत आहोत याचा उमेदवारी यादी हा पुरावा आहे. हा जातिभेद अजिबात नाही. 


प्रश्न : पण यातून चुकीचा पायंडा पडतोय... 
आंब
ेडकर : ही रेस आता सुरू झालीय.  कुटुंबशाहीच्या सत्तेला उद्ध्वस्त करायचे असेल तर पहिल्यांदा उमेदवारी सार्वत्रिक व्हावी. लोकसभेवेळी आमच्यावर कुणी विश्वास ठेवत नव्हते. मात्र ४० लाख मते मिळाल्यावर आमची दखल घेतली जाऊ लागली. सगळेजण आलुतेदार, बलुतेदार हे शब्द वापरायला लागले. वंचित समाजांसाठी हे करू, ते करू असे सांगू लागले. हे आमचेच यश आहे. आता आम्हाला  आलुतेदार-बलुतेदारांची सत्ता आणायची आहे.


प्रश्न : मायक्रो ओबीसींचा सत्ता सहभाग म्हणजे काय? 
आंब
ेडकर : माळी, धनगर व वंजारी या तीन जाती सोडल्या तर उरलेले सगळे मायक्रो ओबीसी. देशात त्यांचे प्रमाण ३०-३५% आहे. कोणत्याच पक्षाने त्यांची दखल घेतली नाही. त्यांचे सहजीवन ही खरी लोकशाही आहे, सवर्णांची संस्कृती मुख्य प्रवाहाची नाही. संस्कृती वाद्यासोबत असते आणि वाद्याला चामडे लागते. त्यामुळे ज्यांचा वाद्याशी संबंध नाही त्यांचा संस्कृतीशी संबंध नाही. येथील कला संस्कृती आलुतेदार- बलुतेदारांनी जपली, वाढवली. आम्हीच मुख्य प्रवाह आहोत, बाकीच्यांनी आमच्यासोबत यावे हे.


प्रश्न : लोकसभा व विधानसभा लढतीत काय फरक?
आंबेडक
र : प्रचंड फरक पडलाय. लोकसभेला आम्ही प्रयोग करायला तयार होतो, हरणाऱ्या जागा आम्ही काँग्रेसकडे मागत होतो. तेव्हाच आम्ही विधानसभेची तयारी केली होती. त्यात आम्हाला यश आले. ७४ विधानसभा मतदारसंघांत आम्ही दुसऱ्या क्रमांकावर होतो. ४० लाख मतं मिळाली. ही ताकद निश्चितच निर्णायक ठरेल. 


प्रश्न : एमआयएम सोबत नसल्याचा परिणाम होईल?
आंबेडक
र : काहीच नाही, कारण आम्हाला मुस्लिम मते पडलीच नाहीत. राहिला विषय राज्याचा. सजादचा व्हिडिओ बघा. महाराष्ट्रातील एमआयएम काय खेळ खेळतेय हे तुम्हाला कळेल. उलट, कोणत्याही पक्षात नसलेले, परंतु मुस्लिमांच्या हिताचा विचार करणारे मुस्लिम आमच्याकडे येत आहेत. हे मोठे स्थित्यंतर आहे. 


प्रश्न : भाजप ३७० चा मुद्दा प्रचारात आणत आहे?
आंबेडक
र : हे फारच चांगलं आहे. अमित शहांनी सांगितलं, ३७० कलम आम्ही रद्द केलं, कारण काश्मीरमध्ये आम्हाला जमिनी खरेदी करता येतील. आपल्याकडे शेतकऱ्यांच्या जमिनी बिगर शेतकरी खरेदी करू शकत नाही. आम्ही त्यांना सांगतो, पुन्हा यांचे राज्य आले तर हे तुमच्या जमिनी खरेदी करण्यासाठीही अटीशर्ती बदलू शकतात. जमिनी टिकवायच्या की ३७० कलमाला पाठिंबा द्यायचा हे शेतकऱ्यांनी ठरवावे.


प्रश्न : तुमच्यासाठी मोदी हे हुकूमशहा आहेत, पण तुमच्या एकाधिकारशाहीवर सहकारीही टीका करतात
आंबेडक
र : त्यात तथ्य नाही. आमच्याकडे सामूहिक निर्णय प्रक्रिया आहे.


प्रश्न : लोकसभेच्या वेळी तुम्ही संघाविरोधात आक्रमक होता, ही तीव्रता आता दिसत नाही?
आंबेडक
र : तो लोकसभेचा अजेंडा होता. आता राज्याची निवडणूक आहे, पाच वर्षात काेणता विकास करणार हा आमचा अजेंडा आहे.


प्रश्न : क्रमांक एकचा शत्रू कोण, काँग्रेस की भाजप? 
आंब
ेडकर : भाजपच. काँग्रेस- राष्ट्रवादीला आम्ही स्पर्धक मानतच नाही.


प्रश्न : वंचित सोडून भाजपमध्ये गेलेल्या गोपीचंद पडळकरांबाबत काय तुमचे काय मत आहे?
आंबे
डकर : गोपीचंद पडळकरांनी त्यांचा बळी जाऊ देऊ नये, असा आपला आग्रह असेल. पडळकरांचा मतदारसंघ खानापूर आहे, त्यांनी तेथूनच उमेदवारीसाठी आग्रही असावे. भाजपसाठी बारामती अत्यंत महत्त्वाची आहे.यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच तेथून उमेदवारी घ्यायला हवी होती.


प्रश्न : वंचितच्या यादीत मराठा उमेदवारही आहेत?
आंबेडक
र : महाराष्ट्रात अनेक वर्षे मराठा समाजाची सत्ता होती असे आपण म्हणतो, पण ती मराठा समाजातील बोटावर मोजण्याएवढ्या निवडक कुटुंबांचीच सत्ता होती. जे जे वंचित आहेत ते सगळे आमच्या सोबत आहेत. त्यात मराठा समाजही आहे. सामाजिक मुद्द्यावर आम्ही वंचितांना एकत्र करत आहोत. छत्रपती-  शाहू- फुले-आंबेडकरांच्या विचारांवर एकत्र करत आहोत. महाराजांचं सैन्य अलुतेदार- बलुतेदारांचे होतं. त्याच प्रतीकावर आम्ही लढाई लढत आहोत. त्या वेळी तलवारीची लढाई होती, आता मतांची लढाई आहे. 

बातम्या आणखी आहेत...