आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळी, धनगर भाजप, तर ‘एससी’ काँग्रेसपासून दूर - प्रकाश आंबेडकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसशी आघाडीचे सर्व पर्याय संपल्याचे जाहीर केले आहे. आताची काँग्रेस ही धर्मनिरपेक्ष राहिली नसून त्यांनी साॅफ्ट हिंदुत्व स्वीकारलेले असल्याने त्यांच्याशी साेबत नकाेच, असे सांगताना संघाला घटनेच्या चाैकटीत आणण्याची काँग्रेसची इच्छाच नव्हती, आम्हाला मसुदा तयार करण्यास सांगितल्याचे नाटक केलेे, असा आराेपही आंबेडकर यांनी केला. त्यांच्याशी झालेला संवाद.... 


प्रश्न :  संघाला संिवधानाच्या चौकटीत आणण्याच्या तुमच्या मागणीवर काँग्रेसने तुम्हालाच मसुदा तयार करून देण्यास सांगितले होते. 
अॅड. आंबेडकर :
काँग्रेस ही सेक्युलर किंवा महात्मा गांधींची राहिलेली नाही. आता काँग्रेस मनुवादी झाली आहे. आम्ही साॅफ्ट हिंदुत्ववादी आहोत असे काँग्रेसने जाहीरच केले आहे. 


प्रश्न : साॅफ्ट हिंदुत्ववादी काँग्रेस तुम्हाला चालेल? 
अॅड. आंबेडकर
: काँग्रेस हिंदू असली तर चालते; पण हिंदुत्ववादी नसावी. म्हणूनच संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची अट घातली.


प्रश्न : याचा अर्थ काँग्रेसशी आघाडी करायची हाेती? 
अॅड. आंबेडकर
: तुम्ही काहीही अर्थ काढायला मोकळे आहात.  तुमचे जसे अॅनालिसिस असते, तसे आमचेही काही असतेच. 


प्रश्न : िवदर्भवाद्यांना ठोकून काढू असे गडकरी म्हणाले. तुम्हीही ठाेकशाहीची भाषा केली हाेती?
अॅड. आंबेडकर
:  मी सुपाऱ्या घेऊन ट्रोलिंग करणाऱ्यांना ठोकून काढू, असे मी म्हणालो हाेतो. कारण ट्रोलिंग करणारे डोकं न वापरता फक्त आलेली पोस्ट फारवर्ड करतात. त्यामुळे आपलं डोकं वापरलं नाही म्हणून या कॅरी फाॅरवर्ड पोस्ट करणाऱ्यांना प्रसाद दिलाच पाहिजे. 


प्रश्न : सर्वच पक्ष महिलांना कमी उमेदवारी देतात?
अॅड. आंबेडकर :
मनुवादी पार्टीच उमेदवारी देत नाहीत. नाॅन मनुवादी पार्टी उमेदवारी देते.  


प्रश्न : तुम्ही तर नाॅन मनुवादी आहात. मग... 
अॅड. आंबेडकर :
आम्ही कधी ढिंढोरा पिटत नाही. आम्ही करून दाखवतो. त्यामुळे आमची अंतिम यादी आली की मग बोला. 


प्रश्न : वंचित आघाडी भाजपाची बी टीम आहे का? 
अॅड. आंबेडकर :
पत्रकारांत खरे लिहिण्याची ताकद नाही. २०१४ मध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. त्या वेळी राष्ट्रवादी भाजपची बी टीम आहे, असे एकानेही लिहिले नाही. चुकून-माकून माझे तोंड उघडले गेले तर इथले पत्रकार, राजकीय नेते एक्स्पोज होतील... 


प्रश्न : मग तुम्हाला कोणी थांबवलंय? 
अॅड. आंबेडकर :
सध्या तरी मी एकटा पडलोय... राजीव शुक्लाचे एक प्रकरण मी बाहेर काढले होते. फक्त साडेतीन मिनिटेच ते लाइव्ह चालले. त्यानंतर गायब झाले.


मी माेदी समर्थक की विरोधक? 
पंतप्रधानांना मारण्याच्या कटातील एक म्होरक्या आहे, असा आरोप एका बाजूला माझ्यावर आहे. एक तर मी विरोधात तरी असेन किंवा समर्थनात तरी असेन. पंतप्रधानांना मारण्याचा कट आखणारा समर्थनात कसा असेन? प्रकाश आंबेडकर पंतप्रधानांना मारण्याच्या कटामध्ये, अशा स्टोरीच चार दिवस चालल्या. मी समर्थक की विरोधक, असे काही तरी एक ठरवा, असा प्रश्न त्यांनी माध्यमांना उद्देशून केला.


प्रश्न : आघाडी न करण्याचा फटका काँग्रेसला बसेल की भाजपला? 
अॅड. आंबेडकर
:  २०१४ च्या निवडणुकीमध्ये १२% धनगर तसेच ७५% माळी समाज भाजपसोबत तर अनुसूचित जाती काँग्रेससोबत गेल्या. मात्र आज धनगर भाजप-शिवसेनेपासून दुरावले आहेत. माळी समाजही त्याच स्थितीत आहे. दुसरीकडे अनुसूचित जातीही काँग्रेसपासून दूर जात आहे. राजकीय िनर्णय बदलतात. पण, सामान्य माणसाचे निर्णय बदलत नाहीत. तीन महिन्यांपूर्वी डाॅ. विकास महात्मे भाजप-सेनेशिवाय पर्याय नाही असे सांगत होते. आता तेच मते देऊ नका असे सांगत आहेत.

बातम्या आणखी आहेत...