Home | Gossip | Adah Sharma Selling Vegetable On Road In Unrecognisable Look

रस्त्यावर भाजी विकताना दिसली बॉलिवूड अॅक्ट्रेस, मळलेली साडी, विखुरलेले केस आणि विना मेकअप ओळखणे झाले कठीण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 23, 2018, 02:58 PM IST

अदाचे हे फोटोज तिच्या नवीन चित्रपटातील लूक टेस्टचे आहेत.

 • Adah Sharma Selling Vegetable On Road In Unrecognisable Look

  मुंबई- बॉलिवूड अॅक्ट्रेस अदा शर्मा कायम आपल्या डान्सिंग व्हिडिओमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये मळलेली साडी, विखुरलेले केस आणि विना मेकअपमध्ये अदा रस्त्यावर भाजी विकताना दिसतेय. अदाचे हे फोटोज तिच्या नवीन चित्रपटातील लूक टेस्टचे आहेत. अदाने अलीकडेच एका हॉलिवूड चित्रपटासाठी ऑडिशन दिली आहे. यासाठीच तिने हा लूक केला होता. आता हा चित्रपट अदाला मिळाला की नाही, सोबतच तिची चित्रपटातील भूमिका काय आहे, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

  10 वर्षांत अद्याप मिळाला नाही मोठा चित्रपट...
  - अदाने 10 वर्षांपूर्वी 2008 साली आलेल्या '1920' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
  - त्यानंतर अदाने 'हम हैं राही कार के'(2013) आणि 'हंसी तो फंसी'(2014) या चित्रपटांमध्ये काम केले. पण हे चित्रपट फारसे चालले नाही. अद्याप अदाला एकही मोठा चित्रपट मिळालेला नाही.
  - अदा बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवलसोबत 'कमांडो-2'(2017) मध्ये झळकली होती. चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.

Trending