Home | Sports | From The Field | adam gilchrist not play in big bash tournament in australia

ऍडम गिलख्रिस्टचा ऑस्ट्रेलियातील बिग बैश स्पर्धेत खेळण्यास नकार

Agency | Update - May 27, 2011, 12:05 PM IST

आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार ऍडम गिलख्रिस्ट याने ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या टवेंटी-२० बिग बैश स्पर्धेत खेळण्यास नकार दिला आहे.

  • adam gilchrist not play in big bash tournament in australia

    gili_288आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार ऍडम गिलख्रिस्ट याने ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या टवेंटी-२० बिग बैश स्पर्धेत खेळण्यास नकार दिला आहे. गिलख्रिस्टने या स्पर्धेत खेळण्यास आपल्याजवळ वेळ नसल्याचे म्हटले आहे.

    ऑस्ट्रेलियातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजक चिंता व्यक्त करीत आहेत. या स्पर्धेला यशस्वी बनविण्यासाठी आता विदेशी खेळाडूंना सहभागी करण्यात येणार असून, स्पर्धेची जोरदार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये खेळून ऑस्ट्रेलियात परतलेल्या गिलख्रिस्टने बिग बैशमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. आयपीएलमध्ये खेळण्याचा कालावधी चांगला असून, त्यावेळी खेळण्यास वेळही असल्याचे गिलख्रिस्टने म्हटले आहे. जास्त क्रिकेट खेळल्याने कुटुंबासाठी मी वेळ देऊ शकत नाही. या स्पर्धेत खेळण्यासाठी वेस्टइंडीजचे खेळाडू ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड आणि डेवन ब्राव्हो हे खेळाडू खेळण्याची शक्यता आहे.Trending