आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अस्सल पाहुणे इरसाल नमुने\' च्या सेटवर यावेळी आले संगीत क्षेत्रातील अस्सल हिरे, आदर्श आणि राहुलने केली खूप मज्जा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : लोकप्रिय कार्यक्रम 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' कार्यक्रमामध्ये या आठवड्यात आले होते महाराष्ट्राचे लाडके गायक. संगीताचा वारसा लाभलेले दोन लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे मंचावर आले. मंचावर बऱ्याच गप्पा रंगल्या तसेच गाणी देखील सादर झाली. राहुल देशपांडे यांनी लहानपणीच्या आठवणी तसेच पु. ल. देशपांडे यांच्या आठवणी देखील सांगितल्या. राहुल आणि आदर्श यांनी मंचावर बरीच धम्माल मस्ती केली. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. तसेच अनेक किस्सेही सांगितले. 

 

राहुल देशपांडे यांना मकरंद अनासपुरे यांनी आनंद आणि प्रल्हाद शिंदे यांची गाणी ऐकली का ? विचारल्यास तो म्हणाला, 'नक्कीच. आनंद शिंदे यांची बरीच गाणी ऐकली आहेत. गणपतीच्या वेळेला मिरवणुकीला जायचो तेव्हा तिथे यांची गाणी असायची तेव्हा ऐकली आहेत'. आदर्श शिंदेने बाप्पा मोरया रे ! या गाण्याच्या दोन ओळी म्हणून दाखविल्या. आदर्श आणि राहुल एकत्र असल्यावर गाणी सादर होणार नाही असे शक्यच नाही. राहुलने देखील बगळ्यांची माळ फुले हे गाण सादर केले. यानंतर प्रश्न उत्तरांचा खेळ सुरु झाला. आदर्शला कसला राग येतो हे विचारल्यास तो म्हणाला, 'मला कसलाच राग येत नाही, आणि आलाच तर मी तिथून निघून जातो. कोणालाही दुखवायला मला आवडत नाही'.

 

चक्रव्यूह राउंड मध्ये आदर्शला सुरेश वाडकर यांच्याविषयी एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली असता तो म्हणाला, 'आवडती गोष्ट म्हणजे “आवाज”. जेंव्हा मी त्यांच्याकडे जायचो तेंव्हा मला नेहेमी वाटायचं असं गाण मला आयुष्यात कधीच जमणार नाही. गाण सोडून दिलेलंच बर'. यानंतर आदर्शने सुरेश वाडकर यांचे ए जिंदगी हे गाण म्हणून दाखवले. याच राउंड मध्ये राहुलला प्रशांत दामले यांच्याबाबत आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली तेंव्हा तो म्हणाला, 'आवडती गोष्ट म्हणजे “सळसळत चैतन्य”. तसेच या दोघांना दोन संवाद दिले जे त्यांना गाण्याच्या चालीत म्हणायचे होते. राहुल देशपांडे यांनी पु.ल.देशपांडे यांची एक सुंदर आठवण प्रेक्षकांना सांगितली आहेत.

 

राहुल देशपांडे यांनी सांगितले की, 'शास्त्रीय संगीतावर घरं चालवण खूप कठीण आहे. कारण ते एका विशिष्ट वर्गाकरता आहे. जेव्हा राजाश्रय होता तेव्हा उत्तम होतं पण आता लोकाश्रयामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी देखील बरोबरीने कराव्या लागतात.

 

बातम्या आणखी आहेत...