आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी एबीसीच्या जाळ्यात, पाच लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांच्यासह तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून महादेव महाकुंडे या दोघांना पाच लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली. शासकिय निवासस्थानी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एबीसी) अधिकार्‍यांच्या मदतीने पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली. 

 

या कारवाईनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बी.एम.कांबळे यांच्या नांदेड, औरंगाबाद, तळेगाव आणि बीड येथील निवासस्थानी छापे मारण्यात आले. उच्चपदस्थ अधिकारी लाच घेताना पकडला गेल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...