आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राप्तिकर परताव्यासाठी आधार-पॅन संलग्नीकरण अनिवार्य : सुप्रीम कोर्ट 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. प्राप्तिकर परतावा दाखल करण्यासाठी "आधार'ला पॅन कार्डशी संलग्नित करणे अनिवार्य असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. संबंधित प्रकरणात निर्देश देताना न्यायालयाने याआधीच प्राप्तिकर कायद्यातील "कलम १३९ ए ए' ला योग्य ठरवले असल्याचे न्यायमूर्ती ए.के. सिकरी आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांच्या पीठाने नमूद केले. "आधार'चे पॅन कार्डशी संलग्नीकरण न करता श्रेया सेन आणि जयश्री सातपुते यांचा २०१८-१९ चा प्राप्तिकर परतावा दाखल करून घेण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले होते. या आदेशाविरुद्ध केंद्र सरकारने केलेल्या अपिलावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिले. सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी २६ सप्टेंबरला निकाल देत प्राप्तिकर कायद्यातील कलम १३९ ए ए योग्य ठरवले होते. त्याप्रमाणे पॅन कार्ड व आधारचे संलग्नीकरण अनिवार्य आहे. 


घटनापीठाने दिला होता निकाल 
घटनापीठाने २६ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्राची आधार योजना घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे म्हटले होते. प्राप्तिकर परतावा दाखल करणे आणि पॅन नंबरच्या वाटपासाठी "आधार' अनिवार्य असल्याचे सांगितले गेले. पण बँक खात्यासाठी आधार आवश्यक ठरवले नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...