आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Adhir Said : On One Side Temple Of Rama Is Being Built And On The Other Side Suta Mata Is Being Burnt

अधीर म्हणाले- इकडे रामाचे मंदिर, तिकडे सीतामातेला जाळले जात आहे

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसचा सभात्याग, भाजपच्या मीनाक्षी लेखी म्हणाल्या- गुन्हेगार पळाले तर वाचणार नाहीत
  • दिलासा : हैदराबादमध्ये घटनास्थळी लोकांच्या पोलिसांच्या समर्थनार्थ घोषणा
  • चकमकीच्या घटनेवरून नेहमीप्रमाणे वादाला सुरुवात, देश-विदेशातील मीडियामध्ये चर्चेला ऊत

​​​​​नवी दिल्ली : संसदेच्या हिवाही अधिवेशनात लोकसभेत शुक्रवारी उन्नाव, मालदा आणि हैदराबादच्या अत्याचाराच्या घटनांवरुन जोरदार गदारोळ झाला. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, एकीकडे रामाचे मंदिर बनवले जात आहे तर दुसरीकडे सीता मातेला जाळले जात आहे. उन्नाव पीडितेला ९५% जाळण्यात आले. देशात काय होत आहे? यावर भाजप खासदार स्मृती इराणी म्हणाल्या की, अत्याचाराला जातीय रंग देणारे आज भाषण देत आहेत. असे आधी पाहिले नाही. त्यांनी आरोप केला की, केरळमधील दोन काँग्रेस खासदार बाह्या चढवून त्यांच्यावर चालून आले. या कृत्याबद्दल काँग्रेसने त्यांची माफी मागायला हवी अशी त्यांनी मागणी केली. उन्नावबद्दल बोलणारे पश्चिम बंगालमधील मालदाला विसरले. पश्चिम बंगालच्या पंचायत निवडणुकीत अत्याचाराला राजकिय हत्यार म्हणून वापरण्यात आले. चर्चेनंतर काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.

शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, महिला अत्याचाराचे खटले सरळ सर्वोच्च न्यायालयात चालावेत यासाठी कायदा तयार करण्याची आवश्यकता आहे. या मुद्द्यावर समिती स्थापन व्हायला हवी.

भाजप सदस्य मीनाक्षी लेखींनी सांगितले की, उन्नाव प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. हैदराबाद प्रकरणावर म्हणाल्या की, आराेपींनी पळण्याचा प्रयत्न केला तर बंदुकीचा वापर करतील. तृणमूलचे खासदार सौगत रॉय म्हणाले की, प्रत्येक वेळी आपण या मुद्द्यावर चर्चा करतो. कठोर शिक्षेची तरतूद असतानाही. निर्भयाकांडातील दोषींना घटनेच्या सात वर्षांनंतरही शिक्षा देण्यात आली नाही.

बसपचे दानिश अली म्हणाले की, अत्याचाराचे आरोपी जामीन मागतात तेव्हा पोलिस शांत का राहतात? ताकदीनिशी पोलिस आरोपींच्या जामिनाला विरोध का करत नाहीत? उन्नाव प्रकरणात कमी इच्छाशक्ती दिसली.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट केले की, कोणाला तरी न्याय मिळाल्याचा आनंद आहे. कायद्यापासून पळणारे न्यायापासून किती पळतील? अशी घटना कोणासोबतच घडणार नाही तेव्हाच खरा आनंद मानता येईल.

पश्चिम बंगालमध्ये एका पीडितेचे कुटुंब म्हणाले पोलिसांनी योग्य केले


- पश्चिम बंगालमधील कमुदिनी सामूहिक बलात्कारातील पीडितेचे कुटुंबियांनी सांगितले की, हैदराबाद अत्याचाराच्या दोषींना असाच मृत्यू द्यायला हवा होता. पोलिसांनी योग्य काम केले. पोलिसांनी असे केले नाही तर गुन्हेगारी आणखी वाढेल. 


- समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विट केले की, कोणाला तरी न्याय मिळाल्याचा आनंद आहे. कायद्यापासून पळणारे न्यायापासून किती पळतील. अशी घटना कोणासोबतच घडणार नाही तेव्हाच खरा आनंद मानता येईल. 


- बसप प्रमुख मायावती यांनी सांगितले की, यूपी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यायला हवी. यूपी पोलिस आरोपींना सरकारचे पाहुणे बनवून ठेवते हे क्लेशदायक आहे. दिल्ली आणि यूपी पोलिसांनी स्वत:ला बदलायला हवे. 


- भाजप नेते आणि माजी आयपीएस सत्यपाल सिंग यांनी सांगितले की, जर आरोपी पोलिसांच्या कोठडीत असतील तर त्यांचे इनकाउंटर व्हायला नको. मात्र, हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन. त्यांनी स्थितीनुसार कारवाई केली असावी.

घटना : २ वर सुनावणी सुरू, एकाचा निर्णय १२ ला, निर्भयात दया याचिका

अत्याचाराच्या दोन प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. एकाचा १२ डिसेंबरला निकाल येईल. निर्भया प्रकरणात दया याचिका दाखल

उन्नाव : जून २०१७ मध्ये यूपीतील उन्नावमध्ये अल्पवयीनवर सामूहिक बलात्कार. यात भाजपचा माजी अामदार कुलदीपसिंग सेंगर आरोपी आहे. अपघातानंतर पीडित रुग्णालयात.

मुजफ्फरपूर शेल्टर हाेम : बिहारच्या मुझफ्फरपूरमधील शेल्टर होममध्ये अनेक अल्पवयीन मुलींवर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार झाले. याचा खुलासा २६ मे २०१८ रोजी झाला. प्रकरणात शेल्टर होमचे संचालक, पीपल्स पक्षाचे आमदार ब्रजेश ठाकुर आणि जदयू नेत्या मंजू वर्मा मुख्य आरोपी आहेत.


निर्भया केस
: डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीतील पॅरामेडिकलची विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. नंतर मुलीचा मृत्यू झाला. न्यायालयाने सर्व आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली.

कठुआ : वर्ष २०१८ मध्ये भटकणाऱ्या कुटुंबातील ८ वर्षीय मुलीवर जम्मू- काश्मीरच्या कठुआ गावात सामूहिक बलात्कार झाला होता. यात सहा आरोपी आहेत.

न्यायाधीशांची संख्या वाढवून आणि सीआरपीसीतील तरतुदी बदलून पीडितांना लवकर न्याय देता येईल... 


हैदराबादमध्ये अत्याचारानंतर पीडितेला जाळून मारणे आणि उन्नावमध्ये अत्याचार पीडितेला जिवंत जाळण्याच्या घटनांनंतर नवीन वादाला सुरुवात झाली आहे. अत्याचारासंदर्भातील प्रकरणांचा लवकर निपटारा करण्यासाठी आणि दोषींना लवकर शिक्षा देता यावी म्हणून कायदा करण्याची देशभरातून मागणी होत आहे. पवन कुमार यांनी तज्ञांशी याबाबत चर्चा केली.

गुन्हेगारांना शिक्षा द्यायची असेल तर काही तासात याचिका बघून राष्ट्रपती निर्णय का देत नाहीत?

पोलिस व प्रशासनात गुन्हेगारांबाबत संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा यांच्यात कमी आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी कमी तर नेते, व्हीआयपी आणि अिधकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जास्त पोलिस कर्मचारी असतात. फील्डवर पोलिसांना तपासासाठी वेळ मिळत नाही. नेत्यांच्या सुरक्षेमुळे पोलिस वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे गुन्हेगारी प्रकरणात आरोपपत्र वेळेत दाखल होत नाही. तर राष्ट्रपतींकडे दया याचिका अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहतात. शिक्षा द्यायची असेल तर ते काही तासांत याचिका बघून निर्णय का देत नाहीत?

देशात अत्याचाराचे लाखो खटले प्रलंबित, त्वरित न्यायासाठी न्यायमूर्तींची संख्या वाढवा

आज देशभरात लोक अत्याचार पीडितांना लवकर न्याय देण्यासाठी नवा कायदा आणि प्रणाली बनवणे आणि अशा प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी टाइमलाइन करावी असे म्हटले जात आहे. पण प्रत्यक्षात हे शक्य नाही. अत्याचार आणि हत्येसाठी कठोर कायदे पूर्वीपासूनच आहेत, मग हे गुन्हे थांबले का? सरकार नवे कायदे बनवू शकते, पण समस्या ते लागू करण्याची आहे. त्याची जबाबदारी न्यायमूर्तींवर आहे. देशभर अत्याचाराचे लाखो खटले प्रलंबित आहेत. न्यायमूर्तींची संख्या वाढवण्याचीही गरज आहे.
 

सरकारला वाटल्यास हायकोर्टानंतर थेट सुप्रीम कोर्ट आणि नंतरचे पर्याय हटवू शकते

गंभीर गुन्ह्यांत फाशीची शिक्षा झालेल्या दोषींना लवकर शिक्षा मिळावी यासाठी सीआरपीसीच्या तरतुदींत बदल करावा लागेल. सध्याच्या तरतुदींनुसार आधी सत्र न्यायालय शिक्षा देते. त्याला हायकोर्टात आव्हान दिले जाते. हायकोर्टानंतर आढावा याचिका आणि नंतर सर्वोच्च याचिका दाखल केली जाते. नंतर फेरविचार याचिका. त्यानंतर क्युरेटिव्ह याचिकेचा अधिकार असतो. नंतर राज्य सरकार आणि मग राष्ट्रपतींकडे दया याचिकेचा अधिकार आहे. इच्छा असेल तर सरकार हायकोर्टानंतर थेट सुप्रीम कोर्ट आणि त्यानंतरचे पर्याय हटवू शकते.

हे आहेत पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार, त्वरित न्यायकर्ते म्हणून ओळख

हैदराबाद : तेलंगणात व्हेटरनरी डाॅक्टराची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करणाऱ्या चार आरोपींना शुक्रवारी चकमकीत ठार मारण्यात आले. पोलिसांचे पथक सायबराबादचे आयुक्त सज्जनार यांच्या नेतृत्वात सीन रिक्रिएशनसाठी घटनास्थळी आरोपींना घेऊन गेले होते. या वेळी आरोपींनी पोलिसांचे शस्त्र हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गोळीबारात ते ठार झाले. ही चकमक घडवणारे आयपीएस सज्जनार यांची प्रतिमा एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून आहे. ते याच प्रकारे त्वरित न्यायासाठी ओळखले जातात. अकरा वर्षांपूर्वी त्यांच्याच नेतृत्वात अॅसिड हल्ल्यातील तीन आरोपींना ठार मारले होते. १९९६ बॅचचे आयपीएस अधिकारी सज्जनार अविभाजित आंध्र प्रदेशातील पोलिस दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर होते. ते वारंगल (तेलंगण) आणि मेढकमध्ये एसपी होते. त्या वेळी त्यांनी मुलींसोबत गैरवर्तन करणाऱ्या आरोपींचे एन्काउंटर केले होते.

१. सन २०१७ मध्ये वारंगलच्या दहावर्षीय मुलीचे शाळेतून अपहरण करण्यात आले होते. आरोपीने तिला ठार करून मृतदेह विहिरीत फेकला होता. पोलिसांना स्थानिकांचा आक्रोश सहन करावा लागला होता. विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी आरोपी पकडला व त्याला क्राइम सीन रिक्रिएट करण्यासाठी शेतात नेले. आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला असता ठार मारले.

२. ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी भोपाळच्या जेलमधून सिमीचे ८ संशयित दहशतवादी पहाटे २ ते ३ दरम्यान पळून गेले होते. त्यांनी पो. कॉ. रमाशंकर यादवचा गळा चिरून खून केला. तर चंदन सिंगचे हातपाय बांधून दिले होते. पोलिसांनी पाठलाग केला. सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान सर्व आठ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

वर्ल्ड मीडिया


आधी देशभरात पोलिसांवर संताप होता, आता उत्सवाचे वातावरण... 

- अमेरिकेचे लॉस एंजलिस टाइम्स : पोलिसांवर लोकांचा पुन्हा एकदा विश्वास
एन्काउंटरनंतर लोक पोलिसांना आलिंगन देत आहेत. त्यांना हातांवर उचलत आहेत. पोलिसांना आशीर्वाद देत आहेत. यामुळे असे वाटते की, पोलिसांवर लोकांचा पुन्हा विश्वास बसला आहे.

- पाकिस्तानचे डॉन : भारतीय पोलिसांवर चकमकीचे आरोप लागले आहेत
भारतीय पोलिसांवर नेहमीच न्यायिक हत्यांचा आरोप होत असतो. पोलिस त्याला एन्काउंटर म्हणतात. असे एन्काउंटर मुंबईत गँगस्टर संपवणे आणि पंजाब-काश्मीरमध्ये अनेकदा झाले आहेत.

- कतारचे अल जझिरा : आरोपींना हातकडी घातली होती की नाही याचा खुलासा नाही
हैदराबाद अत्याचार आणि हत्या प्रकरणात खुलासा झाला नाही की, चकमकीच्या वेळी आरोपींना हातकडी घातली होती की नाही. पोलिसांनी त्यांना एकत्र बांधले होते का?

- इंग्लंडचे बीबीसी : चकमकीच्या समर्थनादरम्यान महिला अधिकाराचा विचार करा
आरोपींच्या एन्काउंटरचे सोशल मीडियापासून संसदेपर्यंत समर्थन होत आहे. मात्र, अनेक महिला कार्यकर्तींचे म्हणणे आहे की, उत्सव साजरा करणारे आवाज महिला अधिकाराची लढाई मागे नेतील. चकमक संशयास्पद आहे.

सोशल मीडिया : न्याय पोलिसांनी नाही, बंदुकीने दिला, बंदूक न्यायाधीश बनवते... 


हैदराबादमध्ये झालेल्या डॉक्टरवरील सामूहिक अत्याचार आणि खून प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी चकमकीत ठार केले. हे दिवसभर सोशल मीडियात होते. लोकांनी ट्विटर ट्रेंड चालवला.


त्या सर्वांना मनापासून सलाम ज्यांनी हे केले. इतर राज्यांतील पोलिसही यातून शिकतील. - शैलेंद्र पांडे


हैदराबाद पोलिसांनी क्राइम सीन रिक्रिएट केला असेल. मात्र एन्काउंटरमुळे नवा सीन क्रिएट झाला.-रमेश श्रीवत्स


आसाराम, नित्यानंद आणि गुरमीत राम रहीम यांनाही असेच एन्काउंटरमध्ये मारणार का? -आदित्य मेनन


हैदराबाद पोलिसांना खूप खूप शुभेच्छा. मोठ्या माशांशीही असेच करायला हवे. -जसराज


चारही अारोपींना एन्काउंटरमध्ये मारण्यासाठी तेलंगण पोलिसांना शुभेच्छा आणि जय हो.

बातम्या आणखी आहेत...