आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo: कंगनाने मला मारले, शिव्या दिल्या, सँडलही फेकून मारले, स्टार किडने सांगितली आपबिती, म्हणाला-तेव्हा माझी खिल्ली उडवली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - अॅक्टर आणि होस्ट शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनने ट्विटरवर पोस्टच्या माध्यमातून  MeToo शी संबंधित त्याची आपबिती सांगितली. त्याने एकापाठोपाठ एक अनेक ट्वीट करत म्हटले, अनेक लोक मला माझी स्टोरी शेअर करायला सांगत आहेत. पण मला माफ करा कारण दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी माझी स्टोरी सांगितली, तेव्हा माझी खिल्ली उडवण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी अध्ययनने सांगितले होते की, कंगनाबरोबर रिलेशनशिपमध्ये राहिल्याने काय काय सहन करावे लागले होते. त्याने सांगितले होते की, रिलेशनशिपदरम्यान कंगनाने त्याला फिजिकली आणि इमोशनली टॉर्चर केले होते. कंगना त्याला शिव्या द्यायची, एवढेच नाही तर तिने त्याला सँडलही फेकून मारली होती. 

अध्ययनने सांगितली आपबीती
अध्ययन म्हणाला, मी माझे म्हणणे मांडले तर मला असे सांगण्यात आले की, ज्याचे करिअर फ्लॉप आहे त्याला असे बोलण्याचा अधिकार नाही. तो म्हणाला होता, माझ्या आई वडिलांनाही नॅशनल टेलिव्हीजनवर बरेच काही ऐकावे लागले होते. मला आनंद आहे की, MeeToo कॅम्पेनद्वारे लोकांना त्यांचे म्हणणे मांडता तरी येत आहे. 

A lot of people asking me to share my #metoo story..iam sorry but when I did that 2 years ago I was shamed and humiliated...my parents whom I love the most had to listen to some obscene things on National tv ..I was clearly told that a guy with a failed career doesn’t

— adhyayen suman (@AdhyayanSsuman) October 12, 2018

अध्ययनने ट्वीट करत लिहिले, मला आशा आहे की, एवढा काळ मनामध्ये दाबून ठेवलेल्या अनुभवांबाबत लोकांना तशी वागणूक मिळणार नाही, जशी मला मिळाली. 

दोन वर्षांपूर्वी काय म्हणाला होता अध्ययन 
2016 मध्ये अध्ययनने मुलाखतीत म्हटले होते, कंगना मला मारते आणि अपणान करते. काइट्सच्या शुटिंगदरम्यान हृतिकने कंगनाला बर्थ-डेला बोलावले होते. मलाही फोन केला होता. मी फूल आणि महागडी शॅम्पेन घेऊन पार्टीला गेलो. आम्ही बसलो होतो तेव्हाच हृतिक आला. कंगना लगेच उठली आणि फूल-शॅम्पेन देत म्हणाली, हॅप्पी बर्थडे, हे माझ्याकडून. तिने माझी भेटही घालून दिली नाही. ती हृतिक आणि त्याच्या बायकोशी फार फ्रेंडली वागत होती. पार्टीहून परतताना तिने मला थापड मारली, शिव्या दिल्या आणि म्हणाली तू माझ्या यशावर जळतो. थापड एवढी जोरात होती की मी रडू लागलो. 

कारमध्येही वाद.. 
अध्ययन म्हणाला.. संपूर्ण मीडिया बाहेर आहे, मी बाहेर कसा जाणार.. मी मुलांसारखा रडत होतो. थरथर कापत होतो. ती म्हणाली, मी तिला घरी सोडायला पाहिजे. कारमध्ये तिने परत मला मारायला सुरुवात केली. मी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली, म्हटले मी रिक्षाने जातो. मी रस्त्यावर उभा राहून ओरडत होतो. ति शिव्या देत होती. ती रात्र मी कधीही विसरणार नाही. मी घरी सोडले तर तिने मला सँडल फेकून मारली, माझा फोन भिंतीवर आदळून फोडला. 

काळ्या जादूचा आरोप 
अध्ययनने कंगनावर काळी जादू करण्याचा आरोपही केला होता. अध्ययन सांगितले होते, कंगनाने त्याला घरी बोलावून करिअर चांगले चालावे यासाठी पुजा करायची असे सांगितले. मग रात्री 12 वाजता पुजा करून काही वस्तू स्मशानात फेकायला सांगितल्या. 

वर्षभरापूर्वी अध्ययनने सांगितले होते, मी तिला विसरलो आहे. मला पुन्हा ते आठवायचे नाही. अध्ययनने कंगनाबरोबर 'राज-2' मध्ये काम केले होते. दोघांचे अफेयरही होते. पण वर्षभरात ब्रेकअप झाले. 

बातम्या आणखी आहेत...