• Home
  • Bollywood
  • News
  • Aditi Rao gets pity on the trollers, saying 'Trolling is a reality you cannot escape from it'

वक्तव्य / आदिती रावला ट्रोलर्सची येते दया, म्हणाली - 'ट्रोलिंग वास्तव आहे तुम्ही यापासून पळू शकत नाही' 

आमच्यावर कमेंट करून राग काढतात ट्रोलर्स - आदिती 

Nov 08,2019 12:26:48 PM IST

बॉलिवूड डेस्क : अभिनेत्री आदिती राव हैदरीनुसार ट्रोलिंग एक वास्तव आहे, ज्यापासून आपण पळू शकत नाही. एका कार्यक्रमादरम्यान आदितीने ट्रोलिंगशी निगडित मुद्द्यावर चर्चा केली. ती म्हणाली की, तिला ट्रोलर्सची दया येते. सध्या अभिनेत्री आपला आगामी चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन' मध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट पुढच्यावर्षी रिलीज होणार आहे.

"आमच्यावर कमेंट करून राग काढतात ट्रोलर्स"

एक्जिबिट टेक अवॉर्ड्स 2019 मध्ये जाण्यासाठी पोहोचलेल्या आदितीने मीडियासोबत बातचीत केली. यादरम्यान सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगबद्दल ती म्हणाली की, हे वास्तव आहे, ज्यापासून पळता येत नाही. ती म्हणाली की, ट्रोलिंगबद्दल तुम्ही नेहमी सकारात्मक असले पाहिजे. सोबतच तिने तिला ट्रोलर्सवर दया येत असल्याचेही सांगितले.

आदितीनुसार ट्रोलर्स आपल्या आयुष्यात अनेक समस्यांनी ग्रस्त असतात किंवा स्वतःवरच वैतागलेले असतात. यामुळे ते सोशल मीडिया पोस्टवर कमेंट्स करून राग व्याकर करतात. साल देण्यासाठी ती म्हणाली की, आपण एकच गोष्ट करू शकतो, त्यांना दयेने पाहाणे आणि ते लवकर बरे होण्याची आशा करणे. ती म्हणाली की, ती स्वतः ट्रोलर्सला नेहमी लवकर ठीक होण्यासाठी शुभेच्छा देते.

यापूर्वीही अदितीने ट्रोलिंगविषयी मनमोकळी बातचीत केली आहे. काही वर्षांपूर्वी ती ट्रोलर्सबद्दल म्हणाली की, हे लोक विसरून जातात की, सेलिब्रिटीदेखील माणसे असतात.

X