आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहानुभूती नकोच...जाणीव ठेवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदिती शार्दूल

भारतात शारीरिक अपंगत्व असलेल्यांपैकी १५ ते २० % लोक सेरेब्रल पाल्सीनं ग्रस्त आहेत. देशातल्या दर १००० पैकी ३ बाळांमध्ये सेरेब्रल पाल्सी आढळून येते. नुकत्याच ६ आॅक्टोबर रोजी झालेल्या जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त विशेष मुलांच्या शाळेतल्या शिक्षिका आणि समुपदेशक असणाऱ्या एका कार्यकर्तीनं केलेली या आजाराची उकल... 
 
सेरेब्रल पाल्सी म्हणजे मेंदूशी संबंधित अर्धांगवायू अशी होते. सेरेब्रल पाल्सी हा विकार हालचालींशी संबंधित असून यात स्नायूंची शक्ती, त्याचे नियमन आणि अतिरिक्त ताठरतेमुळे हालचालींवर मर्यादा येतात. ही लक्षणे स्नायूंच्या झिजेमुळे नाही तर मेंदूला होणाऱ्या हानीमुळे होतात. सेरेब्रल पाल्सी हे मुख्यत: हालचालींवर परिणाम करणारं अपंगत्व आहे. मी मुद्दाम अपंगत्व हा शब्द वापरते आहे, कारण शारीरिक कामकाजावर सेरेब्रल पाल्सी परिणाम करतेच, पण समाज सुविधा न पुरवून त्याला अपंगत्व आणतो. ़

सेरेब्रल पाल्सी असणारे मूल स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यांच्या हाताच्या, पायांच्या स्नायूंमध्ये ताठरता वाढते. जरी हा प्राथमिकदृष्ट्या हालचालींवर मर्यादा आणणारा विकार असला तरी मेंदूतील ज्या भागावर हा परिणाम घडवतो, त्यानुसार मुलांच्या आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, संवाद, वाचा, संवेदना, श्रवण तसेच दृष्टीवर परिणाम होतो. अशा विशेष मुलावर उपचाराकरिता अनेक उपचार पद्धती उपयोगात आणल्या जातात. 
उपचारादरम्यान मुलांसह पालकांचाही उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाचा आसतो. मुलांच्या स्थूल आणि सूक्ष्मकारक क्षमता, संवेदना, बोधात्मक क्षमता यांचा विचार करून उपचार निश्चित केले जातात. बऱ्याच वेळा मुलांच्या कडक स्नायूंना बोटाक्स इंजेक्शन देऊन शिथिल केले जाते. त्यानंतर मुलांच्या स्नायूंमध्ये नियंत्रण आणि ताकद आणण्याचे काम विशिष्ट व्यायामाच्या मदतीने केले जाते.
 
 
डॉ.  मिठू अलुर (Mithu Alur ) ह्यांनी सेरेब्रल पाल्सीच्या मुलांसाठी सर्वात प्रथम काम सुरू केले.  त्यांची स्वत:ची मुलगी मालिनी सेरेब्रल पाल्सीग्रस्त आहे. डॉक्टरांनी “मुलगी भाजीपाल्याचे आयुष्य जगेल’ असे सांगितले तेव्हा डॉ अलुर ह्यांनी अशा मुलांच्या हक्कांसाठी लढण्याचे ठरवले. Spastic Society Of India ही शाळा मुंबईमध्ये १९७२  ला  सुरू केली.  ह्या शाळेचे नाव आता “ADAPT (Able Disable All People Together) आहे. दिव्यांग मुलांसाठी वडिलांनी सुरू केलेलं काम आता स्वत: मालिनी चीब पुढे नेत आहेत.  मालिनी चीब ह्यांना सेरेब्रल पाल्सी असून पोस्ट ग्रॅज्युएशन लंडन युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले आहे. त्यांचे बरेचसे शिक्षण भारतात झाले आहे व ज्या मुलांना सेरेब्रल पाल्सी आहे ती उत्तमरीत्या शिक्षण पूर्ण करू शकतात, ह्याचे उत्तम उदाहरण त्यांनी समोर ठेवले. Wheelchair वर असून आणि बोलण्यासाठी स्पीच कम्युनिकेटरचा वापर करून त्यांनी दाखवले की, शारीरिकदृष्ट्या क्षमता वेगळी असली तरी सेरेब्रल पाल्सी असणाऱ्‍या मुलांना शिक्षण देऊन उत्तम नागरिक बनवू शकतो. सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांना अनुभवजन्य शिक्षण व बरेच उपकरणे वापरून केलेले शिक्षण गरजेचे असते. उपकरणामध्ये त्यांना पेन्सिल पकडताना gripper ची मदत लागते, बोलता येत नाही, त्यांना कम्युनिकेटरचा वापर करावा लागतो.जेवताना चिकटणारे plates व मोठे चमचे चालताना AFO(बूट) लागते. ह्या सगळ्या उपकरणांची किंमतही देशात खूप आहे. पालक अशा  उपायांचा आधार घेऊन मुलांवर उपचार करायचा प्रयत्न करतात. मात्र अपेक्षित प्रगती न दिसल्यानं डिप्रेशनमध्ये जातात. ह्या मुलांना लागणारे उपचार पण खूप खर्चिक आहेत म्हणून पालक मध्येच उपचार सोडून देतात. त्यामूळे मुलं सक्षम व स्वावलंबी नाही होऊ शकत. जिजा घोष ह्या या क्षेत्रातल्या कार्यकर्तींनं (जी स्वत: या आजाराने ग्रस्त आहे) सोशल वर्कचा अभ्यास पूर्ण करून UK मधून masters चे शिक्षण पूर्ण केले आहे. देशातल्या त्या पहिल्या महिला आहेत, ज्यांनी दिव्यांग असून एका मुलीला दत्तक घेतले आहे. विमान प्रवासादरम्यानं त्यांना मनाई केली गेली. ह्यावर त्यांनी आंदोलन करून दिव्यांग मुलांना accessibility म्हणजेच बाहेर पडल्यावर सर्व सुविधा सरकारने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ramp लिफ्ट toilets व्हीलचेअर जाईल अशी बस, ट्रेन अशा सुविधा पाहिजेत, यासाठी पुढाकार घेतला. देशात सेरेब्रल पाल्सी असणाऱ्य‍ा मुलांना उपचार चांगले उपलब्ध आहेत, पण ते खूप खर्चिक आहेत. त्या दृष्टीने सरकारनं वॉकर,व्हीलचेअरवरचा GST दूर केल्यास मुलांना, पालकांना उपयोग होईल. पालकांनी प्रशिक्षण घेऊन ‘सेरेब्रल पाल्सी’ मुलांना समाजाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. अशा मुलांना सर्व अधिकार मिळण्याची गरज आहे. समाजानंही अशा मुलांकडे केवळ सहानुभूतीनं पाहण्याऐवजी मुलांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी

सेरेब्रल पाल्सीची कारणे
> प्रसूती वेळेआधी होणे
> मूल उशिरा रडणे
> जन्मताना मेंदूला झालेली इजा
> रुबेला लसीकरण न घेणे 
> आयर्न आणि प्राणवायूची कमतरता
> कावीळ, सीझर किंवा मेंदूत पाणी जमा होणे 

‘सेरेब्रल’वरील उपचार पद्धती
> न्यूरो डेव्हलपमेंट थेरपी
> संवेदनांचे एकत्रीकरण
> भौतिकोपचार, व्यवसायोपचार
> स्पीच थेरपी
> आधार साधनांचा वापर
> बोटॉक्स अ‍ॅन्ड सर्जिकल अ‍ँड ओरल मेडिटेशन औषधी
> घोड्याच्या पाठीवरचे व्यायाम, हायपर बेरिक
> ऑक्सिजन थेरपी, न्यूरो डेव्हलपमेंट आणि सेन्सरी इंटिग्रेशन 

लेखिकेचा संपर्क : ७७९८८७३३६५

बातम्या आणखी आहेत...