Home | News | Aditya Pancholi has been charged with a complaint about assault and exploitation

अभिनेता आदित्य पांचोलीवर कंगना राणावतच्या बहिणीने लावले मारहाण आणि बलात्काराचे आरोप

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2019, 05:22 PM IST

कंगना-आदित्यचे अफेअर होते आणि ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे

 • Aditya Pancholi has been charged with a complaint about assault and exploitation

  बॉलीवूड डेस्क- कंगना राणावतची बहीणरंगोलीने अभिनेता आदित्य पांचोलीवर गंभीर आरोप लावत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये रंगोलीने ई-मेलवरून पांचोलीवर मारहाण आणि लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत.


  13 वर्षे जुने प्रकरण
  आरोप आहे की, 54 वर्षीय आदित्यने कंगना जेव्हा बॉलीवूडमध्ये नवीन आली होती, तेव्हा तिला मारहाणी करत तिचे लैंगिक शोषण केले होते. तक्रारीत हेदेखील म्हटले की, आदित्यची पत्नी जरीना वहाबलादेखील या प्रकरणाची संपूर्ण माहिती होती. प्रकरण 13 वर्षे जूने आहे. त्यावेळी कंगना-आदित्यचे अफेअर होते आणि ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे.

  मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे- आदित्य
  आदित्य पांचोलीने आपला बचाव करताना म्हटले की, माझ्यावर खोटे आरोप लावण्यात येत आहेत. मिड-डेला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणाली की- 'मी कंगनावर मानहाणीची तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीला परत घेण्यासाठी कंगनाच्या वकीलाने मला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि माझ्याविरूद्ध खोटी तक्रार दाखल केली. माझ्यावर लावलेल्या आरोपांना काहीच तथ्य नाहीये.'  पुढे अदित्यने सांगितले की- 'जेव्हा मी कंगनाविरूद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा कंगनाच्या वकीलाने मला धमकी दिली आणि याची मी 18 मिनींटाची रेकॉर्डिंगदेखील केली आहे. ही रेॉकॉर्डिंग मी पुरावा म्हणून पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. 25 एप्रिलला वर्सोवा पोलिस माझ्या घरी नोटीस घेऊन आली, तेव्हा मी चकित झालो. मी त्याचवेळी त्यांना रेकॉर्डिंग दिली आणि 12 तारखेला माझा जबाब नोंदवला. तर पोलिसांचे म्हणने आहे की, सध्य दोन्ही पक्षांची बाजू ऐकण्यात आली आहे आणि याआधारे पुढील तपास केला जाईल.

 • Aditya Pancholi has been charged with a complaint about assault and exploitation
 • Aditya Pancholi has been charged with a complaint about assault and exploitation

Trending