आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाविरुद्ध पोलिसांनी नाही उचलले ठोस पाऊल तर आदित्य पांचोलीने पुन्हा दाखल केली एफआयआर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कंगना रनोट आणि आदित्य पंचोलीमधील वाद संपण्याचे नावच घेत नाहीये. आदित्यने पुन्हा एकदा कंगना, तिची बहीण रंगोली चंदेल आणि त्यांच्या वकीलाविरुद्ध वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे. पंचोलीचा आरोप आहे की, पोलिसांनी त्याने आधी केलेल्या तक्रारींवर काहीच अॅक्शन घेतली नाही. त्यामुळे त्याने पुन्हा 30 मेला अॅक्ट्रेसविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 

 

आदित्य पंचोलीचे वक्तव्य... 
पंचोलीनुसार त्याने कंगना, रंगोली आणि त्यांच्या वकिलांविरुद्ध 12 मेला एफआयआर दाखल केली होती. या तक्रारीत पंचोलीने सांगितले होते की, कंगनाच्या वकीलाने त्याला रेप केसमध्ये फसवण्याचा धमकी दिली होती. वकिलाच्या या धमकीचा एक व्हिडीओ पंचोलीने बनवला आणि आपल्या तक्रारीसोबत पोलिसांना दिला. पण आतापर्यंत पोलिसांनी कंगना आणि तिच्या वकीलाविरुद्ध काहीही अॅक्शन घेतलेली नाही. पंचोली म्हणाला - 'पोलिसांना माझ्या तक्रारीची आठवण करून देण्यासाठी मी पुन्हा एकदा तक्रार दाखल केली.' 

 

काय आहे पूर्ण प्रकरण... 
मागील काही दिवसांत कंगनाने पोलिसात तक्रार दाखल केली होती की, 13 वर्षांपूर्वी आदित्यने तिला मारहाण केली होती. तिने मुंबईच्या वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये ई-मेलद्वारे मारहाण आणि शोषण केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पंचोलीने कंगनाची तक्रार खोटी असल्याचे संगत तिच्याचविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. पंचोलीने सांगितले, 'मी कंगनावर बदनामीची केस दाखल केली होती. तीच केस परत घेण्यासाठी कंगनाच्या वकिलाने मला रेप केसमध्ये फसवण्याचा धमकी दिली होती आणि माझ्याविरुद्ध दाखल केलेली हरहाणीची केसही त्याचाच एक भाग होती. माझ्यावर केले गेलेले सर्व आरोप खोटे आहेत.'