आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज आदित्य ठाकरे दाखल करणार अर्ज; प्रथमच जनतेला कळणार ठाकरेंच्या संपत्तीची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनोद यादव 

मुंबई - युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज सकाळी वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अर्जासाेबत आदित्य यांना शपथपत्राद्वारे संपत्तीची माहितीही निवडणूक आयाेगाकडे द्यावी लागेल.  ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणूक लढवणार असल्यामुळे किमान आदित्य यांच्याकडे किती संपत्ती आहे हे यानिमित्ताने कळेल.

आदित्य यांना अर्जात ईमेल आयडी, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर खाते आणि मोबाइल नंबर नमूद करावा लागेल. याबरोबरच एप्रिल २०१४-१५ ते मार्च २०१८-१९ पर्यंत प्राप्तिकर विभागात दाखवलेल्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल. पॅन कार्ड, हिंदू अविभक्त परिवार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींची माहिती द्यावी लागेल. प्रलंबित फौजदारी प्रकरणांबाबत आदित्य काय माहिती देतात, हे जाणून घेणे उत्सुकतेचे ठरेल.अर्जाच्या सातव्या रकान्यात चल-अचल संपत्तीची तपशीलवार माहिती द्यावी लागते. बँकेतील खाती, त्यातील रकमा, मुदत ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड, बाँड, राष्ट्रीय बचत योजना, विमापत्रे, आयुर्विमा, यासह कुठल्या कंपनीत गुंतवणूक केली असल्यास त्याची माहिती आदित्य यांना द्यावी लागेल. कुणाला दिलेले कर्ज किंवा खासगी व्यक्तीकडून घेतलेले कर्ज याबरोबरच सोने-चांदी, हिरे वा इतर मौल्यवान दागिने, वाहनांची, नावावर असलेल्या जमिनीची माहितीही त्यांना द्यावी लागेल. दरम्यान, आदित्य यापैकी काेणकाेणती माहिती जाहीर करतात, याकडे केवळ राज्याचेच नव्हे तर  देशाचे लक्ष लागलेले आहे.

आदित्यला आता जनतेनेच स्वीकारले आहे : उद्धव ठाकरे 
माझा मुलगा आहे म्हणून मी लादणार नाही. त्यांनी स्वीकारले तरच तू यशस्वी होशील, असे शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितले होते. आदित्यबाबतही माझे तेच मत हाेते. परंतु जनतेने त्याला स्वीकारले असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
 

उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रमुख नेत्यांची संपत्ती

> उदयनराजे भोसले
सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवताहेत. {१५७ कोटी २२ लाख {पत्नी दमयंती यांच्याकडे ४ कोटी १४ लाखांची संपत्ती.
एकूण १६१ कोटी ३६ लाख ७५ हजार २९० रु.ची चल-अचल संपत्ती घोषित केली
उदयनराजेंकडे २५ लाख आणि त्यांच्या पत्नीकडे १ लाख ९५ हजार रोख रक्कम असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.
 

> बाळासाहेब थोरात 
संगमनेरमधून उमेदवारी दाखल केली. {थोरातांकडे ५ कोटी ६६ लाख {पत्नीकडे ९६ लाख २४ हजारांची संपत्ती आहे.
एकूण ६ कोटी ६२ लाख ८१ हजार ७०० रु.च्या चल-अचल संपत्तीची माहिती दिली.
मुलगी डॉ. जयश्रीकडे १ कोटी ९५ लाख आणि मुलगा राजवर्धनकडे १ कोटी ९२ लाखांची चल संपत्ती असल्याची माहिती त्यांनी दिली.
 

> एकनाथ खडसे 
मुक्ताईनगरमधून अपक्ष अर्ज. स्वत: आणि पत्नीकडे २२.९८ कोटी चल-अचल संपत्ती असल्याची माहिती.
 

> अर्जुन खोतकर : 
जालन्यातून उमेदवारी. ७.६७ कोटींची चल-अचल संपत्ती. मुलगा अभिमन्यूकडे २ .२४ लाख रु.ची संपत्ती.
 

> अबू असीम आझमी
यांनी स्वत: आणि पत्नीकडे एकूण २०९ कोटी ८ लाख चल-अचल संपत्ती असल्याची माहिती दिली.
मंगलप्रभात लोढा यांनी एकूण ४४१ कोटींची चल-अचल संपत्ती घोषित केली. याशिवाय त्यांच्यावर २८३ कोटींचे कर्ज असल्याची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...