आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेशाने व्यावसायिक असलेले आदित्य ठाकरे कोट्यधीश; सोने-चांदी, शेअर्ससह इतकी आहे संपत्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य आदित्य ठाकरेंच्या संपत्तीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान निवडणूक अर्ज दाखल करतेवेळी आदित्य यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार ते कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे. 

आदित्य यांच्याकडे 11 कोटी 38 लाख रूपये इतकी संपत्ती असून एक बीएमडब्ल्यू कार, दागदागिने, दुकाने आणि शेअर्स याचा संपत्तीमध्ये समावेश आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या प्रतिज्ञापत्रात ही कागदोपत्री संपत्ती जाहीर केली आहे.
 

अशी आहे कोट्यवधी संपत्ती
आदित्य ठाकरेंनी पेशाने व्यावसायिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. प्रतिज्ञापत्रात दाखल केल्याप्रमाणे त्यांच्याकडे 10 कोटी 36 लाखांच्या बँक ठेवी आहेत. 20 लाख 39 हजार रुपयांचे बॉन्ड शेअर्स आहेत. साडेसहा लाखांची एक बीएमडब्लू बाईक आहे. 64 लाख 65 हजारांच्या सोन्याचा यामध्ये समावेश आहे. तर 10 लाख 22 हजार अशी एकूण 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आदित्य ठाकरेंच्या नावावर आहे.

बातम्या आणखी आहेत...