आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंकडे ~१६ कोटींची संपत्ती, रोहित पवार १८ कोटींचे धनी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनोद यादव 

मुंबई - देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या परिवारांपैकी एक असलेल्या ठाकरे कुटुंबीयांकडे एकूण संपत्ती किती, याची अंदाजे माहिती प्रथमच  समोर आली आहे. युवासेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी वरळीतून अर्ज दाखल करताना १६ कोटी ५ लाख १२ हजार १७२ रु.ची चल, अचल संपत्ती असल्याची माहिती दिली आहे.

आदित्य यांनी आपल्याकडे केवळ १३ हजार ३४४ रु. रोख रक्कम असल्याची माहिती शपथपत्रात दिली आहे. त्यांनी ११ कोटी ३८ लाख ५ हजार २५८ रु.ची चल आणि ४ कोटी ६७ लाख ६ हजार ९१४ रु.ची अचल संपत्ती असल्याची माहिती दिली आहे. याव्यतिरिक्त हिंदू अविभक्त परिवाराच्या रकान्यात ३९ हजार १२३ रु. रोख आणि १ कोटी ६४ लाख १६ हजार ३०२ रु.ची चल संपत्ती असल्याची माहिती दिली आहे.

साडेसहा लाखांची बीएमडब्ल्यू कार : 
आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कार आहे. या कारची सध्याची किंमत त्यांनी ६ लाख ५० हजार दाखवली आहे. याशिवाय त्यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार ७४ रु.ची ज्वेलरी आहे. यात ४.५८ कॅरेट हिरे आणि २४ कॅरेटच्या सोने-चांदीच्या ज्वेलरीचा समावेश आहे. आदित्य यांच्यावर अद्याप एकही गुन्हा दाखल झालेला नाही. 
 

उद्धव ठाकरेंवरही मंदीचा परिणाम : 
देशातील मंदीचा परिणाम उद्धव ठाकरेंवरही झाला आहे. याचा उलगडा आदित्य यांच्या उमेदवारी अर्जात झाला आहे. 

उद्धव यांचे आयकरला दाखवलेले उत्पन्न
२०१४-१५    २४ लाख ६४ हजार ८० रु.
२०१८-१९    २ लाख ४ हजार ७८० रु.
२०१५-१६    १७ लाख १ हजार ७१० रु.
२०१६-१७    १२ लाख ५२ हजार ९९० रु.
२०१७-१८    ३ लाख ११ हजार १० रु.
 

आदित्य यांनी दाखवलेले उत्पन्न असे
२०१८-१९    २६ लाख ३० हजार ५६० रु.
२०१७-१८    ७ लाख १९ हजार ९५६० रु.
२०१६-१७    ९ लाख ३५ हजार ११० रु.
२०१५-१६    ८५ लाख ५० हजार ७० रु.
२०१४-१५    २२ लाख १५ हजार ७०० रु.
 

कर्जत- जामखेड मतदारसंघातून गुुरुवारी राेहित पवार यांनी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात धनगर मतदारांचे प्राबल्य असल्यामुळे राेहित चक्क धनगरांच्या वेशभूषेत आले हाेेते.
 

आदित्य व्यावसायिक; व्याज, भाडे, फर्मचा नफा, डिव्हिडंडचे उत्पन्न

> आदित्य यांनी उदरनिर्वाहाचे साधन व्यवसाय. उत्पन्नाचे साधन व्याज, भाडे, फर्मच्या नफ्यातून मिळालेला भाग आणि डिव्हिडंड. १० कोटी ३६ लाखांची चल संपत्ती. ४ कोटी ५६ लाख ६६ हजार ८७९ रु. च्या एचडीएफसी व सारस्वत बँकेत मुदत ठेवी आहेत.

> याशिवाय ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत एचडीएफसी बँक खात्यावर ५ कोटी ७८ लाख ३ हजार ३३४ रु., आयसीआयसीआय बँकेत ४३ हजार ७२९ रु., भवानी बँकेेत २७६ रु., सारस्वत बँकेत १ लाख रु. आणि इंडियन ओव्हरसीज बँकेत १ हजार रु. जमा आहेत.