आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनआशीर्वाद यात्रा : उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेणार का? आताच पेपर फोडणार नाही...आदित्य ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - मी निवडणूक लढणार की नाही, हा पेपर आताच फोडणार नाही. लढलो तर लोक काय जबाबदारी देणार हे महत्त्वाचे आहे. मी सध्या केवळ जनतेचा आशीर्वाद मागतोय.. जबाबदारी जनताच देईल..” असे मोघम उत्तर शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना दिले. “युतीचे जागावाटप उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री यांच्यात होणार असून त्यावर बोलायला मी खूप छोटा आहे. मला त्यावर बोलणे योग्य वाटत नाही, असेही आदित्य यांनी सांगितले.  नागपुरातील प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील आदित्य संवाद या विद्यार्थ्यांशी संवादाच्या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आदित्य यांनी अतिशय संयमी आणि सावध उत्तरे दिली. आपल्या वक्तव्याने कुठल्याही वादाची ठिणगी पडणार नाही, याची काळजी ते शेवटपर्यंत घेताना दिसले.  युतीच्या जागा वाटपावर भाष्य करायला आपण अद्याप लहान आहोत, असे स्पष्ट करताना आम्ही शिवसेना म्हणून विश्वास तोडणार नाही, असे सूचक विधान त्यांनी केले. युती सत्तेसाठी नाही तर हिंदुत्व हेच युतीचा आधार आहे. सरकारने ३७० कलमाचा प्रश्न सोडवला. राममंदिर, शेतकऱ्यांच्या समस्या आणि विकास हे मुद्दे जागा वाटपापेक्षा महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.  शेतकऱ्याच्या आत्महत्या कडे लक्ष वेधले असता आदित्य म्हणाले, २००७ मध्ये शिवसेनेच्या भूमिकेतूनच कर्जमाफी झाली. आताही कर्जमाफी उद्धव साहेबांच्या प्रयत्नांमुळे आहे. सरकारमध्ये असूनही आंदोलने का करावी लागतात? या प्रश्नावर सरकारमध्ये राहूनही आम्ही प्रश्न सोडवतो, असे त्यांनी सांगितले. विरोधी पक्ष कुठे आहेत, हे कोणालाच माहिती नाही. त्यांचे कामही आम्हीच करतोय, असे आदित्य या वेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...