आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंचा 58 गाड्यांच्या ताफ्यासह नुकसान पाहणी दौरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दोन मंत्री, चार आजी-माजी आमदार आणि ५८ गाड्यांंचा ताफा असा लवाजमा घेऊन शिवसेनेचे युवा नेते नवनियुक्त आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी नाशिक जिल्ह्यातील नुकसानीची पहाणी केली. नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशिरा सुरू झालेल्या या दौऱ्यात बागलाण तालुका वगळावा लागला. झालेले नुकसान मोठे असल्याने केंद्र शासनाने मदत द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, जिवाच बरवाईट करू नका, अशा शब्दांत त्यानी शेतकऱ्यांना धीर दिला.  ठाकरे यांनी मोहाडी, वडनेर भैरव, दाभाडी या गावातील झालेल्या नुकसानीची पहाणी केली. तत्काळ पंचनामे आणि मदतीसाठी शिवसेना प्रयत्न करत असल्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. नुकसान मोठे असल्याने केंद्र शासनाने मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी संगितले.

सेनेचा मुख्यमंत्री, ७/१२ कोरा
नुकसान पहाणी दौरा असल्याने आदित्य ठाकरे यांनी कोणतीही राजकीय प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, सत्ता स्थापन्यावरून राज्यात तापलेल्या राजकीय वातावरणाचे पडसाद या दौऱ्यात दिसून आले. दाभाडी येथील मेळाव्यात आदित्य यांचे भाषण संपताच ‘भावी मुख्यमंत्र्यंचा विजय असो’  अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. टेहेरे गावातील चंद्रकांत शेवळे यांच्या मळ्यातील सडलेल्या कांद्याची पहाणी केल्यावर ‘सेनेचाच मुख्यमंत्री व्हावा आणि सातबारा कोरा करावा’ अशी अपेक्षा शेवाळे यानी मांंडली.