Home | Maharashtra | Mumbai | Aditya Thackeray's Jan Ashirwad yatra will begins with Ambabai's darshan

अंबाबाईच्या दर्शनाने आदित्य यांच्या यात्रेला होणार सुरुवात; मुख्यमंत्र्यांच्या अगोदरच शिवसेनेची यात्रा, काँग्रेसमध्ये सामसूमच

विशेष प्रतिनिधी, | Update - Jul 11, 2019, 09:50 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पुन्हा एकदा शिवशाही सरकार नावाने एक ऑगस्टपासून यात्रा काढणार आहेत

  • Aditya Thackeray's Jan Ashirwad yatra will begins with Ambabai's darshan

    मुंबई - राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून युवा सेनेकडून आदित्य ठाकरे यांचा सोशल मीडियावर प्रचार केला जात आहे. यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न शिवसेना करणार असून त्यासाठीच काढण्यात येणाऱ्या आपल्या जन आशीर्वाद यात्रेला आदित्य ठाकरे शुक्रवारपासून सुरुवात करणार आहेत. शुक्रवारी कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात केली जाणार आहे.


    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पुन्हा एकदा शिवशाही सरकार नावाने एक ऑगस्टपासून यात्रा काढणार आहेत. मुख्यमंत्री गेल्या पाच वर्षात राज्य सरकारने केलेल्या कामांची यादी जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत. परंतु शिवसेनेने आघाडी घेत त्यांच्या अगोदरच आपल्या यात्रेचे नियोजन केले आहे. आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी दोन-तीन मतदार संघांची चाचपणीही करण्यात आली आहे. त्यासोबतच राज्यभरात शिवसेनेसाठी मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे आणि शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केल्याने त्याचा जनतेवर चांगला परिणाम होईल, अशी आशा शिवसेनेला आहे. यासाठीच प्रशांत किशोर यांनी आदित्य ठाकरे यांच्या यात्रेचे नियोजन केले आहे. त्यामुळे या यात्रेकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांचे मन जिंकण्यासाठी आदित्य ठाकरे ही यात्रा काढत आहेत. यात्रेचा परिणामही लवकरच कळणार आहे.

    काँग्रेसमध्ये सामसूमच
    ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून प्रचारासाठी तीन महिने मिळत आहेत. भाजपने बैठकांचा सिलसिला सुरू केला असून शिवसेनाही तयारीला लागली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असली तरी काँग्रेसमध्ये मात्र सामसूमच दिसत आहे. शिवसेना अशा प्रकारे प्रथमच यात्रा काढत असून त्याचा त्यांना निवडणुकीत किती फायदा होईल हे निवडणुकीनंतर कळेलच.

Trending