Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Aditya Thakare is our Chief Ministerial candidate; Shiv Sena MP Sanjay Raut

आदित्य ठाकरे आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती

प्रतिनिधी, | Update - Jul 18, 2019, 08:26 AM IST

विराेधकांच्या आघाडीत मनसेला घेतले जात असण्याच्या शक्यतेवर राऊत म्हणाले, ‘ते डाेनाल्ड ट्रम्प यांनाही आघाडीत घेतील.’

 • Aditya Thakare is our Chief Ministerial candidate; Shiv Sena MP Sanjay Raut

  जळगाव - मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजप युतीत काेणताच वाद नाही. जागा व सत्तावाटपदेखील समसमान हाेईल. लाटेत काेणी एखादी जागा जिंकली म्हणजे ताे मतदारसंघ त्याचा हाेत नाही. अशा अनेक जागांवर चर्चेतून मार्ग निघेल, असे सूताेवाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी जळगावातील पत्रकार परिषदेत केले.


  राज्याला नव्या उमद्या चेहऱ्याची गरज असून ती क्षमता आदित्य ठाकरेत आहे. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहताे, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत स्वबळावर लढताना राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याचा दावा केला हाेता. ‘विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी झाली आहे. या वेळी काेणीही गाफील नाही. काही ठिकाणी आमचे आमदार हाेते, परंतु लाटेत शिवसेनेच्या वाट्याला आलेली एखादी जागा कुणी जिंकली म्हणजे ताे मतदारसंघ त्यांचा हाेत नाही. ती जागा वाटपात पुन्हा शिवसेनेच्या वाट्याला येऊ शकते. जळगाव शहराच्या जागेसाठी माजी मंत्री सुरेश जैन हे युती नसतानाही उमेदवार होते. या जागेबाबत चर्चेअंती निर्णय हाेईल,’ असेही राऊत म्हणाले.


  डाेनाल्ड ट्रम्पलाही आघाडीत घेतील : सत्तेत असताना विमा कंपनीविराेधात शिवसेनेला रस्त्यावर उतरण्याची गरज का भासली? या प्रश्नावर राऊत म्हणालेे, ‘अन्यायाविराेधात लढण्याचा शिवसेनेचा स्वभाव असून ताे कधीही बदलणार नाही. ज्या गाेष्टी विराेधी पक्षांनी करणे अपेक्षित हाेते त्या त्यांनी केल्या नाहीत. विराेधक कुचकामी ठरले,’ अशी टीकाही त्यांनी केली. विराेधकांच्या आघाडीत मनसेला घेतले जात असण्याच्या शक्यतेवर राऊत म्हणाले, ‘ते डाेनाल्ड ट्रम्प यांनाही आघाडीत घेतील.’


  आदित्य आजपासून यात्रेवर
  विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्यातून गुरुवारपासून जन आशीर्वाद यात्रा सुरू करत आहेत. पाचाेरा, भडगाव, कासाेदा, एरंडाेल, धरणगाव, चाेपडा, सावखेडा, पाराेळात त्यांचे मेळावे हाेतील.

Trending