आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे सुपुत्र अदित्य ठाकरे होऊ शकतात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री...?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभा निकालानंतर देशासह राज्यभरात राजकीय पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असताना, आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 4 वाजता युवासेनेची शिवसेना भवनात बैठक होणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे कळाले आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतची घोषणा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षासह, भाजपातील केंद्रीय पक्षश्रेठी त्याबाबत आग्रही आहेत.


आज सायंकाळी 5 वाजता शिवसेनेच्या नेत्यांची बैठक होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीव बैठक बोलावली आहे. बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि उपमुख्यमंत्री पदावर चर्चा होण्याची शक्यता आहे. जर शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळाले, तर आदित्य ठाकरे यांचे नाव शिवसेनेकडून दिले जाऊ शकते. त्यामुळेच आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


आदित्य ठाकरेंची चर्चा
आदित्य हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा होत होत्या. पण स्वत: उद्धव ठाकरे यांनी ती चर्चा फेटाळून लावली होती. "बाळासाहेबांनी कधीच माझ्यावर कोणते बंधन घातले नाही, मीही आदित्यवर कोणतेच बंधन घालणार नाही. निवडणूक लढवायची की नाही हा त्याचा निर्णय आहे. पण ही निवडणूक तरी तो लढवणार नाही हे निश्चित." असे उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणाले होते.
 

बातम्या आणखी आहेत...