आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासींविषयी चुकीचे वर्णन करणाऱ्या कवीवर कारवाई करा, आदिवासी एकता परिषदेतर्फे आंदोलन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - कवी दिनकर मनवर यांच्या 'दृश्य नसलेल्या दृश्यात'या कविता संग्रहातील कवितेत अादिवासी युवतींविषयी अाक्षेपार्ह वर्णन करण्यात अाले अाहे. त्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी अादिवासी एकता परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. त्याचबरोबर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दिनकर मनवर यांच्या कवितेवर बंदी घालून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे झाली.

 

आंदोलनात अादिवासी एकता परिषदेचे विभागीय अध्यक्ष राेशन गावित, जिल्हाध्यक्ष मंगलदास सूर्यवंशी, जयकर अहिरे, राजेश अहिरे, राजेश चाैरे, रमेश चाैरे, उमेश चाैधरी, करण पवार, सतीश महाले, मिलिंद बिलकुले, शांतू भाेसले, विक्कीकुमार खर्डे, स्वप्निल बागुल, सुनील चाैरे, दत्ता अहिरे, राकेश पाडवी यांच्यासह अादिवासी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या विषयी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कवी दिनकर मनवर यांच्या दृश्य नसलेल्या दृश्यात या कविता संग्रहातील पान क्रमांक १२ वर असलेल्या 'पाणी कस असत' या कवितेत अादिवासी युवतींबद्दल अाक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला अाहे. दिनकर मनवर यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून अादिवासी समाजातील युवतींबद्दल लज्जास्पद टिप्पणी केली आहे. त्यामुळे त्यांच्यासह कविता संग्रहाचे प्रकाशक, या कविता संग्रहाचा अभ्यासक्रमात समावेश करणारे विद्यापीठाचे अभ्यासमंडळ व कुलगुरूंचा निषेध करण्यात अाला अाहे. कवी दिनकर मनवर यांच्यासह प्रकाशकांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना युवती.

 

बातम्या आणखी आहेत...