आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ADJ Begins Court At Night To Visit A Mother In Prison For A 3 year old Boy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

४ वर्षांच्या मुलास तुरुंगातील आईच्या भेटीसाठी एडीजेनी रात्री सुरू केले कोर्ट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिषेक यादव 

सागर (मध्य प्रदेश) - तुरुंगात असलेल्या आईला भेटण्यासाठी रडत असलेल्या ४ वर्षांच्या मुलासाठी मध्य प्रदेशातील सागर येथे बुधवारी रात्री अतिरिक्त जिल्हा न्यायालय खास सुरू केले. जिल्हा न्यायालय परिसरात ४ वर्षांचा मुलगा जारोन अली काकासोबत फिरत होता. तो सतत रडत असल्याने  दैनिक भास्करच्या प्रतिनिधीचे लक्ष त्याच्याकडे गेले. चौकशीत समजले की, या मुलांची  आई नगमा एका अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात सागर मध्यवर्ती तुरुंगात आहे.  आराेपींच्या जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुलांची अवस्था पाहून सदर प्रतिनिधीने तुरुंगाधिकाऱ्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यांना घेऊन प्रतिनिधी तुरुंग परिसरात पोहचला.तुरुंगाधिकाऱ्यांच्या अर्जानंतर न्यायाधीशांनी दिली परवानगी


तुरुंगाधिकारी नागेंद्रसिंह चौधरी यांनी तुरुंग अधीक्षक संतोषसिंग सोळंकी यांना घटनाक्रम सांगितला. सोळंकी यांनी नियमांची माहिती दिली. ते म्हणाले, भेटीची वेळ  संपली आहे. त्यांनी रहमान यांना सकाळी येण्यास सांगितले. दरम्यान तो मुलगा खूप रडत होता. तुरुंग परिसराच्या बाहेर जाण्यास तयार नव्हता. परिस्थिती पाहून अधीक्षक सोळंकी यांनी विशेष न्यायाधीश एडीजे डी. के. नागले यांना घटना सांगितली. त्यांनी मुलाच्या आईचा लेखी अर्ज देण्यास सांगितले. न्यायाधीश रात्री ८.३० वाजता जिल्हा न्यायालयात आले. तुरुंगाधिकारी चौधरी आई आफरिन व अधीक्षक सोळंकी यांचे अर्ज घेऊन सर्वजण न्यायालयात आले. न्यायधीश नागले यांनी सर्व बाजू तपासून मुलास तुरुंगात ठेवण्याची परवानगी दिली. मायलेकराची भेट घडवून समाधान वाटले

^माझ्या आजवरच्या कारकिर्दीत हा पहिला प्रसंग आहे.  या मुलांची अवस्था पाहून कोणीही व्यक्ती भेट नाकारू शकला नसती. न्यायालयानेही कर्तव्यपूर्तीचे उदाहरण घालून दिले. मायलेकरांची भेट घडवून मला खूप समाधान  वाटले. 
संतोषसिंह सोळंकी, तुरुंग अधीक्षक