Home | Maharashtra | Vidarva | Akola | Administration not Remember of martyrs memorials

शहीद स्मारकांचा प्रशासनाला विसर; वीरपित्यांवर आली उपोषणाची वेळ

प्रतिनिधी | Update - Aug 14, 2018, 12:52 PM IST

स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.

 • Administration not Remember of martyrs memorials

  अकोला- जिल्ह्यातील शहीद आनंद गवई व संजय खंडारे यांच्या स्मारकाचा दिलेला शब्द प्रशासनाने पाळला नाही, असा आरोप उद्विग्न होऊन शहिदांच्या वडिलांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला असून, स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.


  २६ जानेवारी २०१७ रोजी जम्मू काश्मिरातील हिमस्खलनात आनंद शत्रुघ्न गवई व संजय सुरेश खंडारे यांना वीरमरण प्राप्त झाले होते. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी दोघांचेही स्मारक उभारल्या जाईल, असा शब्द प्रशासनाने दिला होता. त्यानुसार माना येथील शहीद संजय खंडारे यांच्या अंत्यविधीसाठीची जी जागा निश्चित करण्यात आली होती. त्या जागेवरच स्मारक बांधल्या जाईल असेही त्यांना सांगण्यात आले होते. मात्र दीड वर्ष उलटले तरीही अद्यापही स्मारक उभारण्यात आले नाही. यासाठी शहीद आनंद गवई यांचे वडील शत्रुघ्न गवई व शहीद संजय खंडारे यांचे वडील सुरेश रामचंद्र खंडारे यांनी वारंवार प्रशासनाकडे व शासन दरबारी पाठपुरावा केला. मात्र त्यांना आश्वासनाशिवाय काहीही पदरी पडले नाही.


  ह्या आहेत वीर पित्यांच्या मागण्या
  - पत्रकार चौक (लक्झरी बस स्टॅंड)चौकामधील मोर्णा नदी काठावरील खुली ५ हजार स्क्वेअर फूट जागा स्मारकासाठी द्यावी
  - व्यायाम शाळा, वाचनालय शासकीय खर्चातून बांधावे
  - नेहरू पार्क चौकाचे काढलेले नाव पुन्हा देण्यात यावे


  जेवढे मुलाच्या जाण्याने झाले नाही तेवढे दु:ख..
  देशसेवेत आमची मुले शहीद झाली, याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या अंत्यविधी वेळी त्यांचा सन्मान करण्याचे वचन व आश्वासन दिल्या गेले. परंतु अद्याप पूर्तता झाली नाही. शहीद आनंद गवई यांचे नाव नेहरूपार्क चौकाला देण्यात आले होते. परंतु पाचव्याच दिवशी ते नाव काढून टाकण्यात आले हा शहिदांचा अपमान नाही का? शहीद आनंद गवई स्मारकाकरिता जागेची मागणी केली. तिथे शहीद आनंद गवई स्मारकापेक्षा मोर्णा मॉर्निंग पार्क बनवत आहेत. वयाच्या पंचवीस वर्षाच्या तरुण मुलाच्या जाण्याने जेवढे दु:ख झाले नाही. तेवढे त्यांच्या होत असलेल्या अवहेलनेने होत आहे. शहीद संजय खंडारे यांच्या अंत्यविधीला जागा तर दिली मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही.
  - वीरपिता शत्रुघ्न गवई,
  - वीरपिता सुरेश खंडारे

Trending