आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - गायक अदनान सामीला पद्मश्रीने सन्मानित केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीने 'जय मोदी'चा नारा दिल्यानंतर त्याला भारताचे नागरिकत्व तर मिळेल तसेच त्याचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला जाईल. हा देशातील जनतेचा अपमान आहे. पाकिस्तानातून येऊन भारतात स्थायिक झालेल्या अदनान सामीला केंद्र सरकारने 2015 मध्ये भारताचे नागरिकत्व बहाल केले होते.
भाजप सरकारची चमचेगिरी केल्यामुळे मिळाला सन्मान - काँग्रेस प्रवक्ता
काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी अदनान सामीला पद्मश्री मिळण्यावरून निशाणा साधत म्हटले की, प्रतिष्ठित सन्मान देण्यासाठी 'भाजप सरकारची चमचेगिरी' हा नवीन आदर्श बनला आहे. यावेळी शेरगिल यांनी प्रश्न उपस्थित केला की, कारगिल युद्धात सहभागी झालेल्या सनाउल्लाह सैनिकाला घुसखोर घोषित केले तर सामीला पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्याच्या वडिलांनी पाकिस्तानी वायुसेनेत राहुन भारतावर हल्ला केला होता. असे का?
अदनान सामी यांनी ट्विट करुन कॉंग्रेस नेत्याला दिले प्रत्युत्तर
जयवीर शेरगिलच्या विधानावर अदनान सामीने ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. सामीने लिहिले की, "बाळा, तू तुझा मेंदू 'क्लीयरेन्स सेल' किंवा सेकंड हॅण्ड नॉव्हेल्टी स्टोअरमधून घेतला आहे का? एका मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या कामासाठी कारणीभूत ठरवणे किंवा शिक्षा द्यावी असे बर्कलेमध्ये शिकवण्यात आले आहे का? आणि तुम्ही एक वकील आहात. तुम्ही लॉ कॉलेजमध्ये हेच शिकले आहात का? यासोबत तुम्हाला शुभेच्छा."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.