व्हॅलेन्टाईन डे / 'अदनान सरप्राइज देण्याचा प्रयत्न करताे, पण कायम फसतो' : रोया सामी

व्हॅलेन्टाईननिमित्त पाहुयात आपले काही सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरविषयी काय सांगतात 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 12:08:00 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क : व्हॅलेन्टाईन डेचा सिझन सर्वांसाठी विशेष असतो. तर मग तो आपल्या सेलिब्रिनसाठी तरी कसा अपवाद ठरणार. याच व्हॅलेन्टाईननिमित्त अज्ञानसामीची पत्नी रोया सामी, अदनान सामीविषयी काय म्हणते...


"अदनान माझा व्हावा ही प्रार्थना देवाने पटकन एेकली. आम्ही २००२ला नोव्हेंबरमध्ये भेटलो आणि डिसेंबरमध्ये आमचा साखरपुडा झाला. लवकरच लग्नही झाले. आयुष्याबाबत मी खूप प्रॅक्टिकल आहे. तो थोडा वेगळा आहे. मी जर्मनीहून आलेय. वडील सैन्यात होते त्यामुळे लहानपणापासून शिस्तीची सवय आहे. अदनानचा दीर्घकाळापासून बॉलीवूडशी संबंध होता. त्याला शिस्त नव्हती. येथे इतकी स्पर्धा आहे, तरीदेखील त्याला कधी चिडताना पाहिले नाही. मी प्रत्येक गोष्टीचा ताण घ्यायचे. तो ताण घेत नाही. तो नेहमी म्हणायचा, देवावर सोडून दे. अदनानला दुसऱ्यांना खाऊ घालायला खूप आवडते. मुलगी मदिनात त्याचा खूप जीव आहे. मदिना जे मागते ते त्वरित देतो. त्याबाबतीत आमचे भांडण होत असते. याशिवाय अदनान मला प्रत्येक व्हॅलेंटाइनला सरप्राइज देण्याचा प्रयत्न करतो, परंतु दरवेळी मला त्याचा सरप्राइज प्लान कळतो आणि तो फिसकटतो.


त्यावर तो मला म्हणतो, तुला तर स्पायएजेंट व्हायला हवे होते. एकदा त्याने मला सरप्राइज देण्यासाठी दिल्लीला बोलावले. तेथून आम्हाला उत्तरेला जायचे होते. दिल्लीला पोहोचल्यावर मला लगेच समजले. तेथून आम्ही ज्यावेळी उत्तरेकडे गेलो तर मला समजले की हा सरप्राइजचा प्लान आहे. मात्र मी त्याला जाणवू दिले नाही, ते पाहून तो खूप खुश झाला. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर तो मनाने तर मी डोक्याने निर्णय घेते. आमच्या लग्नात कोणताही अडथळा आला नाही. अदनान माझी खूप काळजी घेतो. मी कधीच पाकिस्तानला गेले नाही. एकदा मला कामानिमित्त तेथे जावे लागले होते तेव्हा अदनान जर्मनीहून माझी सारखी विचारपूस करत होता."

X