आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नकोशी' झाली 'हवीशी'; तीन वर्षात नाशिकमधून 37 मुली दत्तक; मुलांची संख्या 23; तर 60 बालकांना मिळाले कुटुंब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुले दत्तक घेणाऱ्या पालकांमधून लिंगश्रेष्ठत्वाच्या अवास्तव कल्पना हद्दपार होत असून मुलांपेक्षा मुली दत्तक घेण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात कमालीचे वाढले असल्याची सुखद बाब अाधाराश्रमातून मिळालेल्या अाकडेवारीतून पुढे अाली अाहे. काही पालकांना 'नकाेशा' झालेल्या मुली अाता दत्तक चळवळीमुळे 'हव्याशा' झाल्या असल्याचे निदर्शनास येत अाहे. दत्तक देण्याची प्रक्रिया अाॅनलाईन झाल्यापासून अाधाराश्रमात तीन वर्षांच्या काळात ९१ बालके दाखल झाली अाहेत. त्यात ३७ मुली अाणि २३ मुलांना दत्तक घेण्यात अाले अाहे. दत्तक सप्ताहाच्या निमित्ताने हा विशेष वृत्तांत. 

 

'मुलगा म्हणजे वंशाचा दिवा' असा समज करीत मुलगा दत्तक घेण्याचे प्रमाण पूर्वी माेठे हाेते. परंतु, सरकारी पातळीवर राबविले जाणारे 'बेटी बचाव' सारखे अभियान, शालेय पातळीवर स्त्री-पुरुष समानतेवर केली जाणारी जागृती अाणि सुशिक्षितता वाढल्याने दूर हाेत चाललेला लिंगभेद याची परिणती म्हणून पालकांमध्ये मुलगी दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले अाहे. अाधाराश्रमातून मिळालेल्या अाकडेवारीवरून हे स्पष्ट हाेते. 


२३ मुले 
एकूण ६० 
३७ मुली 
३० मुलांना घराची प्रतीक्षा 

 

अाधाराश्रमात तीन वर्षांच्या काळात ९१ बालके दाखल झाली असून ६० बालकांना अाॅनलाईन प्रणालीतून घर मिळाले अाहे. मात्र, ३० बालके अजूनही घराच्या प्रतीक्षेत असल्याचे या अाकडेवारीवरून निदर्शनास येते. 

 

मुली दत्तक घेण्यात महाराष्ट्र अव्वल 
१९१७-१८ या वर्षात देशभरात एकूण तीन हजार २६७ मुले दत्तक घेतली गेली आणि त्यामध्ये मुलींचे प्रमाण ६० टक्के (एक हजार ८५८) होते. चाइल्ड अॅडॉप्शन रिसोर्स अथाॅरिटीने (सीएआरए) २०१२-१३ या वर्षापासूनची याबाबतची राष्ट्रीय आकडेवारी जारी केली आहे. २०१६-१७ साली देशभरातून ३ हजार २१० बालकांना दत्तक देण्यात आले. त्यापैकी १ हजार ९१५ या मुली होत्या. त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रमाण ७११ म्हणजे एकूण दत्तकच्या प्रमाणात ६० टक्के होते. तर कर्नाटकात २५२ मुली दत्तक घेण्यात आल्या. दत्तक घेण्यात महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळविले आहे. जी १ हजार ८५८ बालके दत्तक देण्यात आली, त्यामध्ये महाराष्ट्रातून एकूण ६४२ मुले दत्तक देण्यात आली त्यामध्ये ३५३, तर कर्नाटकमधून २८६ मुले दत्तक देण्यात आली. त्यात १६७ मुलींचा समावेश आहे. 

 

जागृती व समुपदेशनामुळे झाले शक्य 
बेवारस अवस्थेत मुली अाढळण्याचे प्रमाण अधिकच अाहे; परंतु त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणजे सुशिक्षीत कुटुंबे अाता दत्तक घेण्यासाठी मुलींना प्राधान्य देत अाहेत. सरकारी अाणि स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर करण्यात अालेल्या जनजागृतीची ही परिणती अाहे. अनाथाश्रमात केल्या जाणाऱ्या समुपदेशनामुळेदेखील पालकांचा कल मुलींकडे वळत अाहे. - राहुल जाधव, समन्वयक, अाधाराश्रम 

बातम्या आणखी आहेत...